Premier

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

Virat & Anushka gave surprise gift to all paparazzies : विराट आणि अनुष्काने पापाराझींना खास गिफ्ट पाठवत त्यांच्या मुलांची प्रायव्हसी जपल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर त्यांच्या कृतीचं कौतुक होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील पॉवर केपीएल विराट-अनुष्का काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. वैयक्तिक आयुष्याबाबत ते कधीच फारसं बोलत नाहीत आणि त्यांच्या मुलांनाही त्यांनी या झगमगटापासून दूर ठेवलं आहे. पण नुकतच अनुष्का आणि विराटने केलेल्या कृतीने सगळ्यांचं मन जिंकलं.

अनुष्का आणि विराटने सगळ्या फोटोग्राफर्सना आज एक सुंदर सरप्राइज गिफ्ट पाठवलं. त्यांच्या मुलांची प्रायव्हसी जपल्याबद्दल आणि त्यांच्या मतांचा आदर केल्याबद्दल विराट-अनुष्काने त्यांचे आभार मानले. विरल भयानीने सोशल मीडियावर या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला. “आमच्या मुलांची प्रायव्हसी जपल्याबद्दल आणि कायमच आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आभार.” असं आभार मानणारं छोटसं कार्डसुद्धा या गिफ्ट बॉक्समध्ये देण्यात आलं होतं.

या गिफ्टमध्ये एक बॅग, एक पाण्याची बाटली, पॉवर बँक, स्मार्ट वॉच अशा फोटोग्राफर्सना उपयोगी पडणार्‍या गिफ्ट्सचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच अनेक वस्तु त्यांना गिफ्ट करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर या गिफ्ट बॉक्सचे फोटो व्हायरल होत आहेत.

अनुष्का आणि विराटने सुरुवातीपासूंच त्यांच्या दोन्ही मुलांना मीडियापासून दूर ठेवलं आहे. कायमच त्यांच्या या निर्णयात त्यांना फोटोग्राफर्स सहकार्य करत आलेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विराट-अनुष्काने केलेल्या कृतीने सगळ्यांचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर या जोडीचं सध्या कौतुक होतंय.

काही दिवसांपूर्वी अनुष्का दोन्ही मुलांना घेऊन लंडनवरुन परत आली होती. यावेळी तिने सगळ्या फोटोग्राफर्सशी भेट घेतली आणि त्यांना मुलगा अकायचा चेहराही दाखवला. सोबतच लवकरच एखाद्या गेट टुगेदरमध्ये भेटण्याचं वचनही तिने त्यांना यावेळी दिलं होतं. विरल भयानीने यासंदर्भातील अपडेट सोशल मीडियावर शेअर केला होता.

दरम्यान, अनुष्का आता विराटच्या प्रत्येक आयपीएल मॅचला हजेरी लावत असून ही जोडी एकत्र क्वालिटी टाईम घालवत आहे. मॅचदरम्यान सुरू असलेली त्यांची मस्ती आणि त्यांचं बॉंडिंग सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आरसीबी टीमबरोबर साजरा करण्यात आलेल्या अनुष्काच्या वाढदिवसाचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT