Weekend Ott Release ESAKAL
Premier

Weekend Ott Release: वीकेंडला ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारे 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज नक्की बघा

Weekend Ott Release: नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी-5 आणि सोनी लिव्ह यांसारख्या प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.

priyanka kulkarni

Weekend Ott Release: ओटीटीवर (OTT) विविध विषयांवर आधारित चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या आठवड्यात ओटीटीवर नवीन वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे तुम्ही वीकेंडला घरबसल्या पाहू शकता. नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार,झी-5 आणि सोनी लिव्ह यांसारख्या प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.

शैतान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि आर. माधवन यांचा शैतान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपटट 'वश' या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे कथानक ब्लॅक मॅजिकवर आधारित आहे. या चित्रपटात एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे.

  • प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स

  • रिलीज डेट-3 मे

'ब्रोकन न्यूज सीझन 2'

'ब्रोकन न्यूज' या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ब्रोकन न्यूज' ही लेब सीरिज 'प्रेस' या ब्रिटीश मालिकेचा हिंदी रिमेक आहे. या वेब सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

  • प्लॅटफॉर्म- ZEE5

  • रिलीज डेट-3 मे

'मंजुम्‍मेल बॉयज' 

'मंजुम्‍मेल बॉयज'या मल्याळम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट जर तुम्ही थिएटरमध्ये नसेल पाहिला, तर आता हा तुम्ही घरबसल्या पाहू शकणार आहात. नुकतीच या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचं कथानक मंजुम्मेलच्या मित्रांच्या एका ग्रुपभोवती फिरते जे एका ट्रीपला गेलेले असतात.

  • प्लॅटफॉर्म- डिज्नी प्लस हॉटस्टार

  • रिलीज डेट-5 मे

The Atypical Family

कोरियन ड्रामा बघायला अनेकांना आवडतो. आता लवकरच एक कोरियन ड्रामा सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं नाव The Atypical Family असं आहे. या वेब सीरिजचे एकूण 12 एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  • प्लॅटफॉर्म-  नेटफ्लिक्स

  • रिलीज डेट-4 मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT