Heeramandi Latest News 
Premier

Heeramandi Latest News : हिरामंडी मधील ‘या’ अभिनेत्रीचं दिग्दर्शक भन्साळी यांच्याशी खास नातं

Heeramandi Latest News : संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा हिरामंडी - द डायमंड बझार या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे.

रोहित कणसे

संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा हिरामंडी - द डायमंड बझार या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर गाजतोय. तवायफांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमातून स्वातंत्र्यपूर्व भारतातील परिस्थिती , वेश्यांचं आयुष्य, त्यांचं होणारं शोषण आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग ही गोष्ट उलगडणार आहे. या सिनेमातील सहाही अभिनेत्रींनी सुरुवातीपासूनच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे पण या सिनेमातील एका अभिनेत्रीच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याशी खास नातं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया…

हिरामंडी या सिनेमाच्या ट्रेलरमधून सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री शर्मीन सैगल आणि संजय लीला भन्साळी यांचं एकमेकांशी खास नातं आहे. शर्मीन ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. शर्मीनची ही आई संजय यांची सख्खी बहीण आहे. मामा संजय यांच्यासोबत शर्मीनचे खास संबंध आहेत.

सोशल मीडियावर बऱ्याचदा ती तिचे लहानपणीचे फोटोज शेअर करते ज्यात ती संजय यांच्यासोबत खेळताना दिसतेय. शर्मीनने संजय यांच्या निर्मिती संस्थेतूनच इंडस्ट्रीत प्रवेश केला. ‘रामलीला’ या सिनेमात तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. संजय यांची निर्मिती असलेल्या ‘मलाल’ या सिनेमातुन तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराचं नॉमिनेशनही मिळालं होतं.

Sharmin Sega

२०२३ मध्ये शर्मीनने अमन मेहताशी लग्नगाठ बांधली. तिच्या या लग्नाला संजय स्वतः उपस्थित होते. सोशल मीडियावर तिने तिच्या लाडक्या मामांसोबतचे फोटोज शेअर केले होते. शर्मीनचा नवरा अमन टोरंट फार्मा या कंपनीत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतोय. शर्मीनच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते.

दरम्यान, हिरामंडी या सिनेमात शर्मीन आलमझेब ही भूमिका साकारतेय. मनीषा कोईराला साकारत असलेल्या मल्लिकाजान या व्यक्तिरेखेच्या चार मुलींपैकी सगळ्यात धाकट्या मुलीची व्यक्तिरेखा ती साकारतेय. आलमला खानदानी तवायफ बनायचं नसून नवाबपुत्र असलेल्या तिच्या प्रियकराशी संसार थाटायचाय. या साठी ती करत असलेले प्रयत्न या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

१ मे २०२४ ला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजिदा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

SCROLL FOR NEXT