dimple kapadia sakal
Premier

राजेश खन्नांपासून वेगळं झाल्यावरही डिंपल कपाडियाने का केली नाही घटस्फोटाच्या कागदावर सही? पैसा नाही 'हे' होतं कारण

Dimple Kapadia: डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची प्रेम कहाणी अगदी वेगळी असली तरी ती तितकीच त्रासदायक ठरली.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचे टॉप अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची प्रेमकहाणी अगदीच निराळी आहे. चाहते अजूनही त्यांच्याबद्दल चर्चा करताना दिसतात. डिंपल राजेश यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. तर काका ३१ वर्षांचे होते. त्यांचा संसार सुरू तर झाला मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. लवकरच ते दोघे वेगळे झाले. डिंपल त्यांचं घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी राहू लागली. मात्र असं असलं तरी त्यांनी एकमेकांना कधीच घटस्फोट नाही दिला. डिंपल घटस्फोटाच्या कागदांवर सही करायला तयार नव्हती त्यामागेही मोठं कारण होतं.

डिंपलने १९७३ मध्ये राजेश यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिचा 'बॉबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातून अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र लग्नानंतर तिने एकाही चित्रपटात काम केलं नाही कारण राजेश खन्ना यांचा तिच्या काम करण्याला विरोध होता. तेव्हा आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या करिअरवर पाणी सोडलं. काही वर्षातच डिंपल २ मुलींची आई झाली. मात्र आता राजेश खन्ना आणि टिना मुनीम यांच्या लिंकअपच्या चर्चांमुळे डिंपल अस्वस्थ राहू लागली. ती त्यांच्यासोबत मॉरिशिअसला शूटला देखील गेली होती. मात्र तिथे त्यांच्यातील जवळीक पाहून ती भारतात परत आली.

का केली नाही सही?

परत आल्यानंतर राजेश आणि डिंपल यांच्यात दुरावा आला तो कायमचा. डिंपल आशीर्वाद बंगला सोडून गेली मात्र तिने कधीही त्यांना घटस्फोट दिला नाही. त्यामागे कारण होतं मुलींचं भविष्य. राजेश यांनी मुलींच्या भविष्याची जबाबदारी घ्यावी असं तिला वाटत होतं. त्यांनी मुलींच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी राजेश यांच्याकडे दिली होती मात्र राजेश हे मान्य करायला तयार नव्हते. घटस्फोट दिल्यानंतर राजेश आपल्या मुलींना वाऱ्यावर सोडतील अशी भीती वाटल्याने तिने कधीही घटस्फोटाच्या कागदांवर सही केली नाही. त्यामुळे ते कायम घटस्फोट न घेताच वेगळे राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT