yashwantrao chavhan natyasankul  sakal
Premier

यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी विशेष सुविधा; ठरलं सरकत्या खुर्चीची सोय असलेलं पहिलं नाट्यगृह

yashwantrao chavan natyasankul: माटुंग्याचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे २२ जूनपासून सुरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

yashwantrao chavan natyasankul Latest News: नाटकातून नाट्यरसिकांना वेगळी अनुभूती मिळत असते. मात्र आवड असूनही वयोमानामुळे आणि शारीरिक व्याधींमुळे ज्येष्ठ नाट्य रसिकांना प्रयोगाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा रसिकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून नूतनीकरणानंतर नाट्यरसिकांसाठी २२ जूनपासून खुल्या होणाऱ्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नाट्यरसिकांच्या सोयीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय केली आहे. या सुविधेमुळे नाटक बघण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नाट्यरसिकांना खूप फायदा होणार आहे. ज्या रसिकांना जिने चढणं शक्य नाही असा रसिकांना या सरकत्या खुर्चीच्या मदतीने पहिल्या माळ्यावर सहजरित्या पोहचता येणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल हे महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

yashwantrao chavhan natya sankul

रसिकांच्या आवडीचे आणि हक्काचे नाट्यगृह असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाचा बदलता चेहरामोहरा नाट्यरसिकांना सुखावणारा असून अखिल भारतीय नाट्यपरिषदेने सुरु केलेल्या या सुविधेमुळे अधिक फायदा होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुला प्रमाणे अन्य नाट्यगृहात ही सुविधा सुरु करण्याचा मानस असल्याचे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले. नाट्यरसिकांमध्ये ज्येष्ठ नाट्यरसिकांची संख्या अधिक असते. वयोमानानुसार शारीरिक अडचणींमुळे त्यांना चांगल्या नाटकाला मुकावं लागू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचललं असल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT