Yudhra Movie Review  sakal
Premier

युध्रा Movie Review: ॲक्शन-लोकेशन्स प्रभावी; पण कथा निष्प्रभ

Movie Review: युध्रा सूडाच्या आगीत जळत असतो कारण ड्रग्ज माफियांनी त्याच्या आई-वडिलांना मारलेले असते.

(शब्दांकन -संतोष भिंगार्डे)

Yudhara News: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक प्रकारचे ॲक्शन चित्रपट आले. त्यातील ॲक्शन दृश्यांनी रसिकांना मोहिनी घातली. आतापर्यंत खतरनाक आणि थरारक अशी ॲक्शन दृश्ये आपण चित्रपटांमध्ये पाहिलेली आहेत.

आता प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘युध्रा’ हा चित्रपटदेखील त्याच पठडीत बसणारा आहे. डोळ्यांची पारणे फेडणारी ॲक्शन दृश्ये, त्याचबरोबर नयनरम्य लोकेशन्स अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

या चित्रपटाची कथा सूडाने पेटलेल्या युध्रा राठोड या तरुणाची. युध्रा लहानपणापासूनच तापट आणि रागीट स्वभावाचा असतो. त्याचे त्याच्या रागावर नियंत्रण राहात नसते. निकहत (मालविका मोहनन)वर त्याचे लहानपणापासून प्रेम असते; परंतु युध्रा सूडाच्या आगीत जळत असतो कारण ड्रग्ज माफियांनी त्याच्या आई-वडिलांना मारलेले असते.

त्यामुळे तो त्या ड्रग्ज माफियांविरुद्ध लढा पुकारतो. त्याकरिता त्याला रेहमान (राम कपूर) मदत करीत असतात. रेहमान एक पोलिस अधिकारी असतात आणि त्यांनादेखील या ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करायचा असतो. त्यामुळे ते युध्राला मार्गदर्शन करीत असतात. युध्रा कशाप्रकारे ड्रग्ज माफियांविरुद्ध लढा देतो... त्यामध्ये त्याची मैत्रीण निकहतची त्याला कशाप्रकारे मदत होते... रेहमान नेमका काय आणि कसा निर्णय घेतात.. याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक रवी उदयवार यांनी श्रीदेवीच्या ‘माॅम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता त्यांनी स्टायलिश आणि ॲक्शनबाज चित्रपट आणलेला आहे. चित्रपटामध्ये ॲक्शनचा भडिमार अधिक आहे. सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, मालविका मोहनन, गजराज राव, राम कपूर, शिल्पा शुक्ला या कलाकारांनी सुरेख अभिनय केला आहे. विशेष बाब म्हणजे, सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटामध्ये कमालीचा भाव खाऊन गेला आहे.

ॲक्शन आणि नृत्यामध्ये त्याने आपली कमाल दाखविली आहे. मालविका मोहनन ही पडद्यावर सुंदर दिसली आहे आणि तिची कामगिरी चमकदार अशीच झाली आहे. राम कपूरने आपल्या वाट्याला आलेले सीन्स उत्तमरीत्या केले आहेत. राघव जुयालने शफीक नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि त्याने त्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. ‘किल’ या चित्रपटानंतर त्याने या चित्रपटातील भूमिकेत आपली छाप चांगली उमटविली आहे.

ॲक्शन दिग्दर्शक निक पॉवेल यांनी केलेली कामगिरी उत्तम झाली आहे. त्यांची ॲक्शन कोरिओग्राफी थरारक आहे. ॲक्शन हा या चित्रपटाचा मुख्य आत्मा आहे. चित्रपटातील लोकेशन्स सुंदर आहेत आणि ती आपल्याला भुरळ घालणारी अशीच आहेत.

सिद्धांतच्या डान्स मुव्हज झकास झाल्या आहेत; मात्र चित्रपटाची कथा काहीशी कमजोर आहे. त्यामध्ये फारसे काही नावीन्य आहे, असे वाटत नाही. त्यामुळे पूर्वार्धात चित्रपट पाहताना कंटाळा येतो. मुळात कथाच जुन्या वळणाची असल्यामुळे पटकथेबद्दल न बोललेले बरे, तरीही ॲक्शन चित्रपट पाहणाऱ्यांना हा चित्रपट आवडू शकतो.

अडीच स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT