Zee Marathi Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Promo 
Premier

जालिंदरला अद्दल घडवत सूर्या तेजूच्या मुलींचं करणार जंगी स्वागत ! "शाब्बास झी मराठी" प्रेक्षक झाले खुश

Zee Marathi Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Promo : झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असून सूर्या जालिंदरला चांगलीच अद्दल घडवणार आहे. मालिकेत काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया.

kimaya narayan

  1. झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सूर्या आणि त्याच्या पाच बहिणींच्या भावविश्वावर आधारित आहे.

  2. मालिकेत आता तेजू आई झाली असून तिला जुळ्या मुलींचा जन्म झालाय.

  3. जालिंदरला मुलगा होईल असं तांत्रिकाने सांगितलेलं असतानाही मुलींचा जन्म झाल्यामुळे तो अस्वस्थ होतो.

Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा. सूर्या आणि त्याच्या पाच बहिणींची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडते. या मालिकेत सूर्याची बहीण तेजू आई झाली आहे. मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

मालिकेत पाहायला मिळालं की, जालिंदरला एक तांत्रिक त्याच्या घरी मुलगाच जन्मला येणार असं सांगतो. तर घरात आलेली जोगतीण घरात मुली जन्माला येणार असल्याची भविष्यवाणी करते. तेजुला त्या भविष्यवाणीप्रमाणे जुळ्या मुली होतात. त्यामुळे जालिंदर हादरतो.

प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, सूर्या जालिंदरला समजावण्याचा प्रयत्न करत असताना तो ऐकत नाही. तेव्हा सूर्या चिडतो आणि जालिंदरच्या कानाखाली मारतो. तुमच्यावर विश्वास ठेवून तेजुला मी तुमच्या हाती सोपवलं ही चूक केली असं म्हणतो. तो तलवार काढतो आणि जालिंदरवर हल्ला करायला जातो. तो तेजुला वाजतगाजत घरी घेऊन जाणार असल्याचं जाहीर करतो.

मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. "असा भाऊ प्रत्येक बहिणीला पाहिजे","अंगावर काटा आला बघताना ...एकच नंबर दाखवले","झी मराठीचं कौतुक, भारी प्रोमो","खुप छान डोळ्यात पाणी आल","प्रत्येक ताई ने आणि भावाने बघावा अस एपिसोड असेल हा. याचबरोबर त्या भावाने म्हणजे सूर्या ने आपल्या बहिनीना जे संस्कार दिले त्याची ही दखल घ्यावी नाहितर आपल्या सोईनुसार फक्त भाऊ आपल्या बहिनीला घरी घेउन आला इतकच आदर्श घ्याल" अशा कमेंट्स केल्या आहेत.

जालिंदर आता काय नवीन कट कारस्थान रचणार ? मालिकेत काय ट्विस्ट येणार ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा लाखात एक आमचा दादा दररोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त झी मराठीवर.

FAQs :

  1. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका कुठे प्रसारित होते?
    – ही मालिका झी मराठीवर प्रसारित होते.

  2. या मालिकेतील तेजू कोण आहे?
    – तेजू ही सूर्याची बहीण आहे आणि सध्या ती आई बनली आहे.

  3. मालिकेत तांत्रिक आणि जोगतीण यांचं भाकीत काय होतं?
    – तांत्रिकाने मुलगा होईल असं सांगितलं, तर जोगतीणने मुलींचा जन्म होईल अशी भविष्यवाणी केली.

  4. तेजुला कोणते बाळ झाले?
    – तेजुला जुळ्या मुली झाल्या आहेत.

  5. या नवीन वळणामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता का आहे?
    – जालिंदरची निराशा, भविष्यवाणीतील विरोधाभास आणि घरातील नवीन तणाव यामुळे कथानकात रंगत वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अतिवृष्टीनं पीक मातीमोल, लेकानं मृत्यूला कवटाळलं; १२ तासात वृद्ध वडिलांनी सोडले प्राण, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

माेठी बातमी! 'दसऱ्याला झेंडू खाणार भाव'; पावसाने नुकसान केल्याने उत्पादनात घट, दर शंभरी पार जाण्याची शक्यता

Sports Success Story: जिद्दीने गाठला ‘एशियन गेम्स’चा टप्पा; सुदेष्णा शिवणकरची कामगिरी; जपानच्या स्पर्धेतही वाजावा डंका

आजचे राशिभविष्य - 01 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : भिंत खचली, चूल विझली

SCROLL FOR NEXT