Digital Marketing  esakal
प्रीमियम ग्लोबल

Amazon, Microsoft सारख्या कंपन्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे केंद्राचे ३ हजार कोटींचे नुकसान?

Shraddha Kolekar (श्रद्धा कोळेकर)

पुणे : मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या जागतिक पातळीवरील कंपन्या व्यवसायांचे मार्केटिंगचे मेसेज पाठवताना वैध मार्गांचा वापर न करता व्हाट्स अ‍ॅप आणि टेलीग्रामसारख्या साधनांचा उपयोग करून मेसेज करत असल्याने सरकारी तिजोरीचे ३००० कोटीचे नुकसान होत असल्याचा आरोप 'सेल्युलर ऑपेरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' ने दूरसंचार विभागाचे सचिव नीरज मित्तल यांना पत्र लिहीत केला आहे.

याबाबत 'द इकॉनॉमिक टाइम्स' या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारतातही प्रमुख तीन दूरसंचार कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योग समूहाने मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉनसारख्या जागतिक कंपन्यांवर कायदेशीर मार्गातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.

COAI पत्रात काय म्हणाले?

नीरज मित्तल यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, यामुळे केवळ परवाना आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन नाही तर सरकारी तिजोरीचे नुकसान आणि विदेशी चलन कमाईचे नुकसान देखील आहे.

तर सेल्युलर ऑपेरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI ) म्हंटले की, लायसन्सचे नियम आणि निकष यांच्याकडे दुर्लक्ष करत सर्व ट्रॅफिकच अशा पद्धतीने व्यावसायिक मेसेज करत आहेत ज्यामुळे पुढे जाऊन नियमांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरू शकतो तसेच सरकारी तिजोरीवर देखील परिणाम होऊ शकतो.

टेलीकॉम कंपन्यांच्या पत्रात काय?

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आणि आयडिया चे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपन्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्राचाही या बातमीत उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात व्हाट्स अ‍ॅप आणि टेलीग्रामच्या माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या 'एंटरप्राइज' सारख्या मेसेजना बेकायदेशीर मार्ग असल्याचे जाहीर करावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

तंत्रज्ञान क्षेत्र, ओटीटी प्लॅटफॉर्म, काही वित्त विभागाशी संबंधित कंपन्या आणि ई कॉमर्स साईट्स या ओटीपीद्वारे जाहिराती आणि त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप सारखे आंतरराष्ट्रीय चॅनेल वापरतात मात्र ते न वापरता टेलीकॉम कंपन्यांद्वारे नियमन केलेली एसएमएस सेवा वापरण्यात यावी असेही या उद्योग समूहांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतातील दूरसंचार कंपन्यांसाठी एंटरप्राइझ मेसेजिंगचा व्यवसाय २५०० कोटी रुपयांचा होता. पण जर हे एंटरप्राइझ मेसेजिंग, डिजिटल पेमेंट्स आणि ई-कॉमर्स व्हॉल्यूम, व्हाट्स अ‍ॅप किंवा तत्सम चॅनेलच्या माध्यमातून होत राहिल्यास टेलीकॉम कंपन्याची कमाई मोठ्या प्रमाणात कमी होईल.

यामुळे सरकारी तिजोरीचे तीन हजार कोटींचे नुकसान होईल असाही मुद्दा पत्रात नमूद असल्याचे संबंधित वृत्तात नमूद केले आहे.

या विषयावर अद्याप मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन या कंपन्यांची तसेच दूरसंचार विभागाची

भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

कोण आहे 'सेल्युलर ऑपेरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया'?

'सेल्युलर ऑपेरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' (COAI) हे असे व्यासपीठ जो भारतीय दूरसंचार उद्योगांच्या विकासासंदर्भात काम करते. यामध्ये धोरणकर्ते, टेलीकॉम कंपन्यांचे प्रतिनिधी, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ असे ज्या ज्या घटकांचा दूरसंचार (टेलीकॉम ) क्षेत्राशी संबंध असतो अशा अनेकांचा यात सहभाग असतो.

अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या, संस्था यांच्याशी देखील या मंचाचा संवाद असतो. एअरटेल, व्ही आणि जिओ हे त्यांचे मुख्य सदस्य आहेत तर अ‍ॅपल, फेसबुक, गुगल, अमेझॉन यासारख्या कंपन्या या त्याच्या सहयोगी सदस्य आहेत.

बिझ.एस.एम.एस (BizSMS) म्हणजे काय ?

वेगवेगळ्या कंपन्या आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मेसेजच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी संपर्क साधते. त्यांच्या मोबाईलवर जे व्यवसायाशी संबंधित मेसेज पाठविले जातात त्यास बिझ.एस.एम.एस (BizSMS) म्हटले जाते.

वैध मार्गाने एका मेसेजसाठी किती पैसे?

कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना जे मेसेज पाठविले जातात. त्या प्रत्येक मेसेजसाठी काही रक्कम टेलीकॉम कंपन्या चार्ज करतात. तर देशांतर्गत प्रत्येक मेसेजसाठी ०.१३ पैसे आकारले जातात तर आंतरदेशीय ग्राहकांसाठी ४ ते ४.३० रुपये प्रत्येक मेसेजसाठी आकारले जातात.

________

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT