long covid
long covid esakal
प्रीमियम ग्लोबल

भीती, मानसिक समस्या नव्हे हे तर लाँग covid चे परिणाम, अभ्यासातून माहिती उघड

Shraddha Kolekar

मुंबई: नेदरलँड मधील ऍमस्टरडम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर (Amsterdam UMC) या विद्यापीठात झालेल्या संशोधनात २५ कोव्हीड झालेले रुग्ण आणि २१ निरोगी रुग्ण सहभागी झाले होते.

या सहभागींच्या वेगवेगळ्या टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये सायकल टेस्टसह काही शारीरिक चाचण्या देखील करण्यात आल्या.

या चाचण्यांमधून निरोगी रुग्ण आणि कोव्हीड झालेले रुग्ण यांच्यात अनेक स्पस्ट होतील इतपत फरक समोर आले. कोविड झालेल्या रुग्णांमध्ये लॉन्ग कोव्हीडची लक्षणे दिसून आली आहेत.

ज्या व्यक्तींना जास्त कालावधीसाठी कोव्हीड (लॉन्ग कोव्हीड) झाला आहे अशा व्यक्तींमध्ये त्यांच्या स्नायूंची शक्ती कमी झाल्याची बाब संशोधनातून समोर आली आहे.

याबाबत ४ जानेवारी २०२४ रोजी नेदरलँड मधील ऍमस्टरडम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर (Amsterdam UMC) यांनी याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले आहे.

या सहभागींना १५ मिनिट सलग सायकल चालविण्यास सांगितले होते. मात्र त्या पूर्वी या सगळ्यांच्याच रक्ताच्या चाचण्या तसेच बायप्सी केली.

त्यात त्यांना असे दिसून आले की, ज्यांना कोव्हीड होऊन गेला आहे त्या लोकांमधील रोगप्रतिकार शक्तीचे कार्य विस्कळीत झाल्याने त्यांचे स्नायूंचे कार्य आणि त्याची रचना यांच्यावर त्याचा परिणाम झाला आहे.

त्यामुळे त्यांचे स्नायूंमध्ये ऊर्जेची कमतरता असल्याचेही त्यांच्या संशोधनातून समोर आले आहे.

या विषयात 'द हिंदू' ने भारतातील विविध संशोधनाचे दाखले देणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारतात झालेल्या अभ्यासात देखील कोविड-१९ ने ग्रस्त असणाऱ्या ५.३ ते ३७.३ % लोकांना एकतर सतत आरोग्याच्या समस्या जाणवतात किंवा काही नवीन आरोग्याच्या समस्या जाणवतात त्या तीन महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या असतात.

थकवा,धाप लागणे, ब्रेन फॉग होणे अशी लक्षणे निरोगी लोकांमध्ये आढळून आली आहेत. यालाच वैद्यकीय भाषेत लॉन्ग कोविड असे म्हंटले गेले आहे. याबाबत अनेक गृहीतके (hypothesis) मांडण्यात आली आहेत.

अनेक ठिकाणच्या संशोधनात सामान्यपणे समोर आलेले लक्षण म्हणजे थकवा आहे. 'लॉन्ग कोव्हीड' झालेल्या रुग्णांना अगदी काही पाऊले जरी अंतर पार केले तरीही त्यांना मोठ्या प्रमाणात थकवा येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

२०२० मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात या विषयात फारसे अभ्यास समोर आले नसल्याने अनेकांना ही कोव्हीडची दीर्घकाळाची लक्षणे हा प्रकार भितीतूनआलेला किंवा मानसिक असेल की काय अशी शंका वाटत होती. परंतु आता ही बाब संशोधनातूनच समोर आली आहे.

सामान्यपणे एखाद्या संसर्गजन्य आजाराचा परिणाम हा जास्तीत जास्त २ आठवडे राहतो. अनेकांना आजारी असताना थकवा येतो. मात्र कोव्हीड या आजाराबाबत अनेकांना तीन ते सहा महिन्यांपर्यंत थकवा जाणवत होता .

तसेच पूर्वी कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींमध्ये देखील काही नव्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

भारतीय लोकांमध्ये अशा पद्धतीने लक्षणे दिसण्याबाबत जवळपास डझनभर अभ्यासात या बाबी समोर आल्या आहेत.

'ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स' (AIIMS) दिल्ली यांनाही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नसलेल्या रुग्णांवर केलेल्या अभ्यासात २८ दिवसांत २८ टक्के रुग्णांमध्ये अशी लक्षणे आढळून आली आहेत.

तर AIIMS भुवनेश्वरमध्ये सहा महिन्यांत अशा ९.२ टक्के रुग्णांमध्ये अशी लक्षणे आढळून आली आहेत. तसेच काही खासगी हॉस्पिटल आणि अन्य राज्यांमध्ये केलेल्या अभ्यासात देखील ही बाब समोर आली आहे.

या मध्ये असाही अभ्यास समोर येतो आहे की ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएन्ट आल्यानंतर लॉन्ग कोव्हीडच्या रुग्णांची संख्या काहीशी कमी आढळून आली आहे.

मलेशियात झालेल्या एका मोठ्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की ओमिक्रॉन झालेल्यापैकी ११.२ टक्के रुग्णांमध्ये लॉन्ग कोविड बळावतो आहे. ज्यांच्यामध्ये तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसून आली आहेत असे हे रुग्ण आहेत.

पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये डॉ.राजेश कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डेल्टाच्या कालावधीत लॉन्ग कोव्हीडच्या रुग्णांची टक्केवारी १२.४ होती जी ओमिक्रॉनच्या कालावधीत ५.३ टक्के इतकी आहे.

या अभ्यासात असे दिसून आले की ज्या व्यक्तींना संसर्ग झाला आहे पण त्यांना लक्षणे नव्हती अश्या व्यक्तींमध्ये लाँग कोविड विकसित झालेला नाही.

भारतात निधनाच्या घटना सोडल्या तर लॉन्ग कोव्हीड बाबत फारसे अभ्यास झालेले नाहीत. त्याचे दीर्घकाळाचे परिणाम जसजसे समोर येऊ लागले आहेत तसतसे आता या विषयात अनेक अभ्यास केले जात आहे.

तसेच प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम दाखविणाऱ्या लॉन्ग टर्म कोव्हीड बाबत अजूनही अभ्यासकांना कुतूहल वाटावे इतक्या नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत.

त्यामुळेच याबाबत भविष्यात अजून संशोधने होतील पण नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोव्हीड आणि त्याचे परिणाम याला गृहीत धरणे हे सर्वांसाठीच धोकादायक ठरू शकते.

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT