Microwave Recipes Pizza saptahik
साप्ताहिक

५ मिनिट्स मायक्रोवेव्ह रेसिपीज

५ मिनिट्स मायक्रोवेव्ह रेसिपीज पिझ्झा, पौष्टिक ढोकळा, टोमॅटो चटणी, मिक्स फ्रूट जॅम, बटरस्कॉच केक

सकाळ वृत्तसेवा

5 Minutes Microwave Recipes

साहित्य

पाव कप मैदा, पाव टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, ३ टेबलस्पून दूध, मीठ चवीनुसार, २ टीस्पून पिझ्झा सॉस, ४ टेबलस्पून किसलेले चीज, ४-५ ऑलिव्ह फळे, चिमूटभर चिलीफ्लेक्स व ड्राय ओरेगानो.

कृती

एका मायक्रोवेव्ह सेफ मगमध्ये मैदा, बेकिंग पावडर व सोडा, दूध, ऑलिव्ह ऑईल व मीठ घालून एकजीव करावे. त्यावर आवडीप्रमाणे पिझ्झा सॉस व चीज घालावे.

ऑलिव्ह फळे, चिलीफ्लेक्स व ओरेगानो घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हाय टेम्परेचरवर दोन मिनिटे ठेवावे. झटपट पिझ्झा तयार. लगेच खावयास द्यावा.

Microwave Recipes dhokla

पौष्टिक ढोकळा

इन मग वाढप एका व्यक्तीसाठी

साहित्य

पाव कप बेसन, पाऊण कप नाचणी पीठ, अर्धा कप दही, १ टेबलस्पून लसूण-हिरव्या मिरच्या व आले पेस्ट, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ स्वादानुसार, १ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून पिठीसाखर, २ टीस्पून फ्रूट सॉल्ट, पाणी जरुरीप्रमाणे,

फोडणीसाठी १ टीस्पून तेल, १ टीस्पून राई, पाव टीस्पून जिरे, २ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, ४-५ कढीपत्ता पाने, कोथिंबीर (सजावटीसाठी).

कृती

काचेच्या बाऊलमध्ये बेसन, नाचणी पीठ घेऊन एकजीव करावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून मऊसर मिश्रण करावे. फ्रूट सॉल्ट घालून हळूवार ढवळावे. मायक्रोवेव्ह सेफ मगमध्ये हे मिश्रण ओतावे. ओव्हनमधे १८० डिग्री सेंटिग्रेडवर चार मिनिटे ठेवावे.

तपासून बघावे. ढोकळा फुगून आला पाहिजे. गॅसवर पॅनमध्ये तेल घालून खमंग फोडणी करून ढोकळ्यावर ओतावी. कोथिंबिरीने सजवून लगेच खावयास द्यावा.

Microwave Recipes tomato chutney

टोमॅटो चटणी

वाढप ४ व्यक्तींसाठी

साहित्य

एक कप टोमॅटोचे बारीक तुकडे, १ टेबलस्पून साखर, एका लाल सुक्या मिरचीचे बारीक तुकडे, आल्याचे २-३ तुकडे, ७-८ भिजलेले बेदाणे, पाव टीस्पून पंचफोरन मसाला, मीठ स्वादानुसार, १ टीस्पून राई तेल.

कृती

काचेच्या बाऊलमध्ये तेल घालून मायक्रोवेव्हमध्ये अर्धा मिनिट ठेवावे. त्यात टोमॅटोचे तुकडे पंचफोरन मसाला व मीठ घालून तीन मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे.

मधे मधे ढवळत राहावे. मग बेदाणे, मिरची, आल्याचे तुकडे व साखर घालून पुन्हा दोन मिनिटे ठेवावे.

Microwave Recipes mix fruit jam

मिक्स फ्रूट जॅम

वाढप २ व्यक्तींसाठी

साहित्य

दोन कप सफरचंद, द्राक्षे इत्यादी आवडीच्या फळांचे तुकडे, पाव कप साखर, १ टीस्पून लिंबू रस, कणभर मीठ, चिमूटभर लवंग-दालचिनी पूड.

कृती

काचेच्या बाऊलमध्ये फळांचे तुकडे व साखर घालून ओव्हनमधे हाय टेम्परेचरवर दोन मिनिटे ठेवावे. बाऊल बाहेर काढून, ढवळून पुन्हा तीन मिनिटे ठेवावे. नंतर बाऊल बाहेर काढून लिंबू रस व दालचिनी पूड घालून एकजीव करावे. चविष्ट जॅम तयार.

Microwave Recipes Butterscotch Cake

बटरस्कॉच केक

इन मग वाढप एका व्यक्तीसाठी

साहित्य

चार टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून पिठीसाखर, चिमूटभर बेकिंग पावडर व बेकिंग सोडा, १ टेबलस्पून तेल, ४ टेबलस्पून दूध, २ थेंब बटरस्कॉच इसेन्स, २ थेंब ऑरगॅनिक खायचा पिवळा रंग.

कृती

एका मायक्रोवेव्ह सेफ मगमध्ये वरीलपैकी प्रथम कोरडे जिन्नस मिक्स करावेत. नंतर ओले जिन्नस घालून एकजीव करावे. मायक्रोवेव्हमध्ये मग दोन मिनिटे ठेवावा.

दोन मिनिटांनंतर तपासून पाहावे. केक फुगून आला पाहिजे. केक फुगला की तयार झाला असे समजावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT