fasting food  esakal
साप्ताहिक

वरी आणि राजगिऱ्यात प्रथिने आणि कर्बोदके नेमकी किती?

सकाळ डिजिटल टीम

सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. या दिवसांत अनेकांचे नऊ दिवसांचे उपवास असतात. या उपवासात देखील पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. त्यासाठीच कोणत्या पदार्थात किती पोषणमूल्य आहेत याची माहिती...

राजगिरा

पोषणमूल्ये - प्रथिने - ४३ टक्के, कर्बोदके - ३२ टक्के, स्निग्ध पदार्थ - ५ टक्के

राजगिरा हा उपवासाच्या पदार्थांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच राजगिऱ्याचे लाडू, चिक्की खातात. राजगिरा पचायला एकदम हलका असतो आणि तत्काळ शरीराला बळ देतो.

यामध्ये प्रथिने सर्वाधिक प्रमाणात आढळतात. प्रोटीनचा उत्तम पर्याय म्हणून राजगिऱ्याचा आहारामध्ये समावेश केला जाऊ शकतो. राजगिरा बियांमध्ये फायटोस्टेरॉल असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. त्यामुळे बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

वरी

पोषणमूल्ये - प्रथिने - १०.६ टक्के, कर्बोदके - ७३.४ टक्के, स्निग्ध पदार्थ - ४.० टक्के, तंतुमय पदार्थ - ६.७ टक्के. तसेच लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस हेसुद्धा मुबलक प्रमाणात आढळते.

वरीचा तांदूळ हा उपवासासाठी संपूर्ण भारतात वापरला जातो. हा तांदूळ पचायला हलका असतो. वरी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो दूर होतो. गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल, तर तेसुद्धा दुखायचे कमी होते.

शाकाहारी लोकांसाठी लोहाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून वरी ओळखले जाते. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असणाऱ्या लोकांना वरी खाणे फायदेशीर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT