Golden Thread taag  esakal
साप्ताहिक

देशाच्या महसुलात १२ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपयांची भर घालणारा ‘सोनेरी धागा’ कोणता?

वनस्पतिजन्य, विघटनशील आणि पर्यावरणपूरक!

साप्ताहिक टीम

सुधीर फाकटकर

‘ताग’ पिकामुळे निर्माण होणाऱ्या धाग्यांपासून दोरखंड, सुतळी, गोणपाट, पोती अशी अनेक उत्पादने घेतली जातात. दैनंदिन व्यवहारात ही उत्पादने शेतीमाल, अन्नपदार्थ, तसेच अन्य कितीतरी वस्तूंचे संरक्षण तसेच साठवणुकीसाठी उपयोगाची असतात.

तागाची लागवड आपल्या देशात ब्रिटिश कालखंडात वाढली. याच अनुषंगाने १९३८मध्ये (आता बांगलादेशात असलेल्या) ढाका येथे ताग कृषीविषयक संशोधन प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली.

पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ही प्रयोगशाळा प. बंगालमधील चिंशुरा या जिल्ह्याच्या ठिकाणी, तर १९५३मध्ये बराकपूर या कोलकात्याजवळ असलेल्या लहान शहरात स्थलांतरित करण्यात आली.

पुढे दशकभरात ही प्रयोगशाळा भारतीय कृषीविषयक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत येऊन १९९०मध्ये ‘केंद्रीय ताग आणि संबंधित धागे संशोधन संस्था’ (Central Research Institute for Jute and Allied Fibres) म्हणून नवनिर्मित करण्यात आली.

तागाप्रमाणेच धागे देणारी अंबाडी, सिसल, मेस्ता, रामी अशी अन्य पिकेही आहेत. ताग आणि संबंधित धाग्यांसाठी पायाभूत तसेच उपयोजित संशोधन साध्य करणे, पीक पद्धती तसेच उत्पादन पश्‍चात घटक-वस्तूंचे तंत्रज्ञान विकसित करणे, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे असे या संस्थेचे ध्येय आहे. या मुख्य संस्थेबरोबरच प. बंगालमध्येच बुदबुद येथे तसेच उत्तर प्रदेश, ओडिशा आणि आसाम येथे उपसंशोधन केंद्रे आहेत.

या संस्थेत ताग तसेच संबंधित पीक सुधारणा, तागविषयक उत्पादन आणि संरक्षण, ताग आणि संबंधित धागेविषयक भारतीय पातळीवरील प्रकल्प असे तीन मुख्य विभाग आहेत. पीक सुधारणा विभागात जनुकीय, पेशी आणि सूक्ष्म पातळीवरील अभ्यास होत असतो.

तसेच ताग धाग्यांच्या लांबी बरोबरच त्यांची मजबुती विकसित करण्यासाठी संशोधन केले जाते. उत्पादन आणि संरक्षण विभागात जैवविज्ञानाच्या अनुषंगाने ताग पिकासाठी माती आणि पिकांसंदर्भात पोषक द्रव्ये, खते, विषाणू नियंत्रक, तणनाशक औषधे असे विविधांगी संशोधन केले जाते.

ताग आणि संबंधित धागेविषयक पिकांच्या नमुन्यांचा विशेष अभ्यासही केला जातो. राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प विभागात पिकांच्या अनुषंगाने भारतात विविध ठिकाणच्या प्रदेशात ताग आणि संबंधित धागेविषयक घेण्यात येत असलेल्या पिकांसंदर्भात हवामानाचे घटक तसेच तिथल्या मृदेशी आवश्यक तपासण्यांचा अभ्यास केला जातो. हे सर्व विभाग जैवविज्ञान आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत उपकरणांच्या प्रयोगशाळांनी समृद्ध आहेत.

स्थापनेपासून विविध टप्प्यांवर या संशोधन संस्थेने शेकडोंच्या संख्येत संशोधन प्रकल्पांतून धाग्याची लांबी, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता, रंग अशी कितीतरी गुणवैशिष्ट्ये असलेले शंभराहून अधिक ताग आणि संबंधित पिकांचे वाण विकसित केले आहेत.

याचबरोबर ताग आणि तत्सम पिकांच्या लागवडीपासून संवर्धन-संरक्षणासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञानही निर्माण करण्यात आले आहे. संकेतस्थळावर असलेले वार्षिक अहवाल, वार्तापत्र तसेच संशोधन पत्रिकांच्या माध्यमातून इथल्या संशोधनाची व्यापक माहिती मिळते.

इथे पीक उत्पादक तसेच व्यावसायिकांना मार्गदर्शनासाठी खास दालनही आहे. जैवविज्ञान तसेच कृषी विषयातील विद्यार्थ्यांसाठी इथे संशोधनाच्या तसेच कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात.

ताग किंवा तत्सम धागे निर्माण करणारी पिके फारशी प्रसिद्ध नसली तरी दैनंदिन व्यवहारांच्या साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे.

सोनेरी चमक असल्यामुळे ‘सोनेरी धागा’ अशी ओळख असलेले ताग धागे वनस्पतिजन्य असल्यामुळे विघटनशील अर्थातच पर्यावरणपूरक आहेत. त्याचबरोबर देशाच्या महसुलात १२ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपयांची भर घालणारा घटकही आहे.

केंद्रीय ताग आणि संबंधित धागे संशोधन संस्था

निलगंज, बराकपोर, कोलकाता 700721

संकेतस्थळः https://crijaf.icar.gov.in

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT