fashion
fashion Esakal
साप्ताहिक

फॅशनेबल रहायची इच्छा आहे, पण लोक काय म्हणतील याची चिंता करताय? जुन्याच कपड्यांना नवा लूक

साप्ताहिक टीम

सोनिया उपासनी

फॅशनेबल राहायची इच्छा तर सगळ्यांनाच असते, पण हिंमत होत नाही. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती कुठेतरी मनात खोलवर असते. पण लोकांचा विचार आपण करायचाच कशाला? शेवटी जे वापरायचे आहे, ते स्वतःसाठी हे एकदा मनाशी पक्के ठरवले की ‘लोक काय म्हणतील’ ही चिंता आपोआप मिटते.

भारत वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, आहार आणि पेहरावांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. इथे प्रांताप्रांतानुसार वेगवेगळ्या रितीभातींबरोबरच विविध प्रकारचे पेहरावदेखील आपल्याला पाहायला मिळतात. भारत हा एक असा देश आहे जिथे पावलोपावली फॅशनचे अनेक रंग-ढंग आपल्याला पाहायला मिळतात. इथे प्रत्येक प्रसंगासाठीही वेगवेगळे पेहराव केले जातात.

भारताच्या इतिहासात डोकावले, तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रांतातील शासनकर्ते भारतात येऊन गेल्याचे दिसते. शेवटचे शासनकर्ते म्हणजे ब्रिटिश. त्या-त्यावेळची त्यांची फॅशन तेव्हाच्या सामान्यांमध्ये रुजली नसली, तरी आता मात्र विविध काळातल्या पेहरावांपासून प्रेरणा घेऊन नानाविध स्टाइल येत असतात.

भारतातील स्त्रियांच्या फॅशनचा विस्तार हा अशा पद्धतीनेही झालेला पाहायला मिळतो. रझिया सुलतानाच्या पेहरावापासून प्रभावित होऊन तयार झालेला रझिया सूट आणि मुघल काळातील पेहरावांपासून प्रेरणा घेऊन केलेला अनारकली सूट ही याची उत्तम उदाहरणे आहेत.

ब्रिटिशांच्या फॅशन सेन्सचाही भारतीयांवर प्रभाव आहे. आणि त्यामुळेच आज अनेक भारतीय स्त्रिया पाश्चिमात्य पेहरावांमध्येही दिसतात. ब्रिटिश रंग तर सर्वांच्या आवडीचे आहेत.

दर महिन्याला नवीन फॅशन मार्केटमध्ये येत असते. त्यातील आपल्याला शोभेल अशी नवीन गोष्ट एकदा तरी स्वतः ट्राय करून पाहावीच. फॅशन ही अशी गोष्ट असते, जी काही काळानंतर पुन्हा पुन्हा ट्रेंडमध्ये येत असते. म्हटले तर पेहरावांचे प्रकार जुनेच असतात, पण जराशी फॅशन बदलून त्यांना वेगळीच चमक आणली जाते.

त्यांचा पूर्ण कायापालट केला जातो. आता सध्याची बूट कट जीन्स बघा; ही जीन्स म्हणजे एकेकाळची बेलबॉटम पँट! पण या जुन्या फॅशनचे कपडे नवीन काळात परिधान करताना सध्याचा ट्रेंड आणि ऑकेजनही लक्षात घेतले पाहिजे.

एखादा पेहराव लग्न समारंभासाठी किंवा अन्य घरगुती समारंभांसाठी चांगला दिसत असेलही, पण तोच पेहराव एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या ऑफिशियल पार्टीमध्ये शोभून दिसेलच असे नाही. त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणता पेहराव घालावा ही गोष्ट लक्षात घेणेही फार महत्त्वाचे आहे.

अनेक तरुण मुली दुपारी होणाऱ्या पार्टीमध्ये इव्हिनिंग गाऊन घालून जातात. पण खरेतर हा पोशाख कधी घालायचा हे त्याच्या नावातच स्पष्ट होते. इव्हिनिंग गाऊन फक्त इव्हिनिंग पार्टीतच घालायचा असतो.

जुने, वापरलेले पण त्याला पुन्हा फॅशनचा टच दिलेले महाग कपडे विकत घेण्याचा ट्रेंडही सध्या जोमात आहे. या ट्रेंडमुळे मध्यमवर्गीय माणसांनाही स्वतःच्या आवडीचे महागडे कपडे घालता येऊ शकतात, शिवाय हे कपडे इतर कुणाकडे नसल्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसू शकता आणि पैशांचीही बचत होते.

फॅशनेबल राहिल्यामुळे ट्रेंडी आणि अपटुडेट दिसता येते. पण ट्रेंडी राहण्याच्या नादात अनेकदा स्त्रिया या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, की वयानुसार त्यांना कोणता पेहराव शोभेल. याबाबत नक्कीच काळजी घेतली पाहिजे. कॉलेज गोइंग विद्यार्थी जशी फॅशन करतात, तशी चाळिशीतल्या स्त्री-पुरुषांनी करून चालणार नाही. ते वाईटच दिसेल.

बऱ्याचदा नोकरी न करणाऱ्या स्त्रियांसाठी फॅशन म्हणजे रंगीबेरंगी साड्या किंवा एखादा साधासा सलवार/लेगिंग कुर्ताच असतो. पण म्हणून फक्त साड्या नेसणाऱ्या स्त्रिया फॅशनेबल नसतात असे नाही. कारण अलीकडे बाजारात साड्यांचेही अनेक फॅशनेबल पॅटर्न मिळतात. पण यात पॅटर्ननुसार ड्रेपिंग करणेही फार गरजेचे असते.

अलीकडे फॅशन वर्ल्डमध्ये साड्यांवरही अनेक प्रयोग होत आहेत. आता साड्यांमध्ये ‘डिझायनर्स क्रिएटिव्हिटी’ दिसून येते. विशेष म्हणजे ड्रेपिंगचे, अर्थात साडी नेसायचे वेगवेगळे प्रकार लक्षात घेऊन साडी डिझाईन केली जाते. मात्र साडी कुठलीही असो, स्त्रिया त्याच जुन्या पद्धतीने ड्रेप करतात आणि मग साडी फॅशनेबल दिसली नाही तर दोष कोणाचा?

साडी ही खरेतर तरुण मुली, महिलांची लाडकी गोष्ट. गेल्या अनेक वर्षांत आपण साडीची अनेक बदललेली रूपे पाहतो आहोत. मागील दोन-तीन वर्षांपासून सिल्क आणि ऑर्गन्झा साडीचा ट्रेंड होता. या वर्षी त्याच साड्या वेगळ्या पद्धतीने ड्रेप करून कमरेला फॅशन बेल्ट लावण्याचा ट्रेंड आहे.

साडी लेहंग्यासारखी ड्रेप करणे, साडीपासून पँट, जॅकेट शिवणे हाही सध्याचा ट्रेंड आहे. लग्नसराईमध्ये स्लिव्हलेस आणि हँडवर्क केलेले ब्लाऊज जास्त उठून दिसतील. ब्लाऊजच्या मागील बाजूस केलेल्या हँडवर्कलाही जास्त मागणी आहे. आजकाल कॅरी करायला सोप्या म्हणून डिजिटल प्रिंट असलेल्या साड्या वापरण्याकडे स्त्रियांचा कल जास्त आहे. या साड्या कमीत कमी किमतीतही सर्वत्र उपलब्ध आहेत.

फक्त आउटफिटच नव्हे, तर अॅक्सेसरींबाबतही स्त्रिया अनेक वेळा चुका करतात. केवळ आउटफिट चांगले असणे जरुरी नाही, तर योग्य अॅक्सेसरींमुळे आउटफिटचा लुक आणखीन उठून दिसतो. म्हणूनच त्यांची निवड योग्य आणि मर्यादित असावी.

पण अनेकदा आउटफिट आणि अॅक्सेसरींची निवड करताना योग्य ताळमेळ राखला जात नाही. जसे की जी हेअर अॅक्सेसरी ट्रॅडिशनल आउटफिटबरोबर घालायला हवी, त्यांचा कॅज्युअल वेअरबरोबर वापर करणे हे चुकीचे ठरेल.

आपल्या आवडीची फॅशन करता न येण्याचे मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. फॅशनेबल राहायची इच्छा तर सगळ्यांनाच असते, पण हिंमत होत नाही. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती कुठेतरी मनात खोलवर असते.

पण लोकांचा विचार आपण करायचाच कशाला? शेवटी जे घालायचे आहे, ते स्वतःसाठी हे एकदा मनाशी पक्के ठरवले की ‘लोक काय म्हणतील’ ही चिंता आपोआप मिटते.

दुसरे असे, की आपल्या समाजात फॅशन करण्यासाठी एक निर्धारित फिगर असणे अतिआवश्यक मानले जाते. पण ही एक भ्रामक समजूत आहे. एवढे सांगेन, बी युवरसेल्फ! आपल्याला काय शोभून दिसते ते पडताळून पाहा आणि आणि रोजच्या आव्हानांना सामोरे जायला तयार व्हा!

---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT