rajasthan
rajasthan  esakal
साप्ताहिक

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेलं राजस्थानातील ते ठिकाण कोणतं?

साप्ताहिक टीम

मनीष केळकर

पधारो म्हारे देश... असे म्हणून भारताबरोबरच जगभरातील पर्यटकांना स्वतःकडे खेचून घेणारे पर्यटन स्थळ म्हणजे राजस्थान! तशी खासियतच आहे या राज्याची.

देशी-विदेशी पर्यटक अधिक प्रमाणात आवर्जून राजस्थानला येतात, याचे कारण म्हणजे या राज्याला लाभलेली पर्यटन वारसा स्थळे.

राजस्थान दोन विभागात विभागले गेले आहे; एक आहे मेवाड आणि दुसरे मारवाड. पूर्वी राजस्थानला जाण्यासाठी दिल्ली आणि जयपूर असे दोनच जवळचे विमानतळ होते.

परंतु, बदलत्या काळानुसार आणि वाढत्या पर्यटनामुळे आज उदयपूर, जैसलमेर, जोधपूर येथेही विमानतळ बांधण्यात आले आहेत. त्यामुळे परदेशी पर्यटकांनाही येथे येणे सोयीचे झाले आहे.

भारतातील सर्वात मोठे वाळवंट राजस्थानात आहे. त्यामुळेच पर्यटकांना मुख्य आकर्षक असते ते सॅम सँड ड्यून  वाळवंटाचे. भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमासुद्धा याच वाळवंटातून जाते.

वाळवंट म्हटल्यावर तिथली उंट आणि जीप सफारी आलीच. राजस्थानातील स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा संगीत-नृत्य कार्यक्रम आणि भोजनाचा आनंद हा या सफारीचा महत्त्वाचा भाग असतो. याच वाळवंटात तुम्हाला सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्ये पाहायला मिळतात.

राजस्थानात पाहण्यासारखी इतरही अनेक ठिकाणे आहेत. जैसलमेरचा किल्ला आवर्जून पाहावा. या किल्ल्याची भव्यता आणि कोरीवकाम पाहण्यासारखेच आहे.

तसेच जैसलमेरमध्येच पटवों की हवेली, गडीसर तलाव  आणि बडा बाग  पाहायला मिळते. या शहराला ‘गोल्डन सिटी’ (सोनेरी शहर) असेही म्हणतात.

बिकानेर हे राजस्थानमधील सर्वात प्रेक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. बिकानेरचा जुनागढ किल्ला, करणी माता मंदिर, गजनेर पॅलेस, लालगढ पॅलेस अशी अनेक पर्यटन स्थळे आपल्याला पाहण्यासारखी आहेत.

ब्लू सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोधपूर शहरातल्या मेहरानगढच्या किल्ल्याकडे पर्यटकांचा नेहमीच ओढा असतो.

उंच टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे, त्यामुळे हा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसतो. तसेच या शहरात जसवंत थडा, मंडोरची मंदिरे, उमेद भवन अशी जुनी स्थळे नक्की पाहावीत.

उदयपूर परिसरामध्ये महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथांना उजाळा मिळतो. त्याचप्रमाणे उदयपूर सरोवरांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे.

फतेह सागर, पिछोला, स्वरूप सागर, रंगसागर आणि दूध तलाई अशी अनेक उत्तमोत्तम सरोवरे इथे पाहायला मिळतात.

त्याशिवाय विविध शैलींमध्ये बांधकाम झालेला सिटी पॅलेस आपल्याला  आकर्षित करतो. या राजवाड्यात काचेचा वापर करून तयार केलेल्या अनेक वस्तू राजवाड्याची शोभा वाढवतात.

चित्तौडगढ येथील किल्ला आणि तेथील सुंदर लाइट साउंड शो बघताना; तिथले अद्‍भुत राजवाडे, संग्रहालयातील तलवारी वगैरे बघतात मन इतिहासात रमून जाते.

इथल्या व्हिंटेज कार... दाल बाटी चुरमाची मेजवानी... हाथी पोल मार्केटमधली खरेदी... राजस्थानी बाहुल्यांचा खेळ... अनुभवावे तेवढे थोडेच!

एकदा आपण इथे गेलो की मंत्रमुग्धच होऊन जातो. रणकपुर मंदिर, कुंभलगड किल्ला आणि किल्ल्याचा परिसर विलक्षण आहे.

भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात येणारे शहर म्हणजेच जयपूर. जयपूर ही राजस्थानची राजधानी. आमेरचा किल्ला  जयपूरपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जयपूरला गेल्यावर या किल्ल्याला भेट देण्याचे नियोजनही करावेच.

ज्वेलरी शो, स्टोनमार्ट आणि रिसर्जंट राजस्थान पार्टनरशिप समिट यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी जयपूर प्रसिद्ध आहे.

अल्बर्ट हॉल संग्रहालय, हवा महल, जल महल, सिटी पॅलेस, जंतर-मंतर, नाहरगड किल्ला, जयगड किल्ला, बिर्ला मंदिर, गढ गणेश मंदिर, मोती डुंगरी गणेश मंदिर अशी कितीतरी ठिकाणे जयपूरमध्ये पाहण्यासारखी आहेत.

जंतर-मंतरला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे.

ब्रह्मदेवाचे जगातील एकमेव मंदिर पुष्कर येथे पाहायला मिळते. पुष्कर येथील सरोवर एक पवित्र स्थान मानले जाते. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला येथे जगप्रसिद्ध पुष्कर मेळावा भरतो. पर्यटक पुष्कर सरोवरात स्नान करतात.

तसेच येथे उंट मेळावासुद्धा भरतो. राजस्थानातील अनेक ठिकाणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. असेच आणखी एक ठिकाण म्हणजे हल्दीघाटी.

इथेच महाराणा प्रताप आणि अकबराच्या सैन्यामध्ये युद्ध झाले होते. याच ठिकाणी महाराणा प्रताप यांचा चेतक नावाचा घोडा मृत्युमुखी पडला. त्याची समाधी येथे आहे.

अशा अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक ठिकाणांनी राजस्थान सजलेले आहे. राजस्थानातील अगणित मनमोहक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी एकदातरी तिथे जायलाच हवे!

-------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT