Pune Commercial Real Estate esakal
Land

Property Today : पुण्यातील कमर्शिअल रिअल इस्टेट व्यवहारांची भरारी

पुण्यातील कमर्शिअल रिअल इस्टेटने (CRE) ऑफिस, रिटल आणि े इंडस्ट्रियल या तीनही आघाड्यांवर व्यवहारांत भरीव वाढ नोंदविली

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील कमर्शिअल रिअल इस्टेटने (CRE) ऑफिस, रिटल आणि े इंडस्ट्रियल या तीनही आघाड्यांवर व्यवहारांत भरीव वाढ नोंदविली असून, २०२५ पर्यंत हा कल असाच कायम राहील, अशीही चिन्हे निर्माण केली आहेत. कुशमन अँड वेकफिल्ड या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातील निवडक नोंदी.

ऑफिस स्पेसेसच्या व्यवहारांत दप्पट वाढ

जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत पुण्यातील ऑफिस स्पेसेसच्या व्यवहारांत गेल्या तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचे निरीक्षण कुशमन अँड वेकफिल्ड या संस्थेने नोंदविले आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ३१ लाख स्क्वेअर फुटांचे भाडेकरार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यापैकी ३८ टक्के भाडेकरार नव्या जागांसाठीचे असून, नव्या जागांच्या करारात गेल्या सव्वातीन वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे.

जवळपास २० लाख स्क्वेअर फुटांसह कल्याणीनगर, खराडी, मुंढवा, येरवडा, नगर रोड, विमाननगर, हडपसर आणि कोंढवा या एसबीडी ईस्ट भागातील उपनगरांनी ऑफिस स्पेसेसच्या व्यवहारात आघाडी घेतली असून, त्यापाठोपाठ औंध, बाणेर, पाषाण, कोथरूड, कर्वेनगर, पौड रोड आणि खडकी या एसबीडी वेस्ट भागातील उपनगरांत ६ लाख स्क्वेअर फुटांचे व्यवहार नोंदविले गेले. तब्बल ३१ टक्के करार आयटी-बीपीएम क्षेत्रातील कंपन्यांनी केले असल्याचे कुशमन अँड वेकफिल्डने म्हटले आहे.

जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत रॉश, ९१ स्प्रिंगबोर्ड, एम्फॅसिस या कंपन्यांनी नव्या जागांसाठीचे व्यवहार केले. २०२५ पर्यंत पुण्यात जवळपास १ कोटी ६३ लाख स्क्वेअर फुटांचा अतिरिक्त ऑफिस स्पेसेसचा पुरवठा अपेक्षित असून, यापैकी ४२ टक्के जागा एसबीडी ईस्ट भागात उपलब्ध होतील. पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळवडे, ताथवडे, पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, बावधन, मुळशी, नांदेड या पीबीडी वेस्ट भागातील उपनगरांत जवळजवळ ३२ लाख स्क्वेअर फुटांच्या नव्या जागा उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

मॉल्सना मागणी, दकानांच् ु या व्यवहारांत वाढ

जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत मॉल्स, तसेच मुख्य बाजारपेठांतील दुकानांच्या व्यवहारांत भरीव वाढ झाल्याचे कुशमन अँड वेकफिल्डने नोंदविले आहे. मॉल्समधील तब्बल १.०४ लाख स्क्वेअर फुटांचे, तर मुख्य बाजारपेठांतील ७३,६०० स्क्वेअर फुटांचे भाडेकरार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात फॅब इंडिया, गॅप, पँटालून्ससारख्या फॅशन ब्रँड्ससह सेव्हन-एलेव्हन, ईटशुअर यांसारख्या फूड अँड बेव्हरेज गटातील व्यवसायांची संख्या लक्षणीय आहे.

येत्या दोन वर्षांत जवळपास १५ लाख स्क्वेअर फुटांची नवी जागा रिटेल व्यवसायांसाठी उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. यापैकी सर्वाधिक ७३ टक्के जागा पीबीडी वेस्ट भागात, तर २७ टक्के जागा सीबीडी भागात असेल. रहिवासी भागाच्या अगदी नजीक मॉल उभारण्याकडे मॉल व्यावसायिकांचा कल असून, २०२३ अखेर कोरेगाव पार्कमधील कोपा मॉल, तर २०२४ अखेर वाकडमधील फिनिक्स मार्केट सिटी नागरिकांसाठी खुले होतील, असेही कुशमन अँड वेकफिल्डच्या अहवालात म्हटले आहे.

इंडस्ट्रियल व्यवहारांत चाकणची सरशी

जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत पुणे आणि परिसरातील इंडस्ट्रियल व्यवहारांनी वार्षिक ६० टक्क्यांची वाढ नोंदविली असून, या कालावधीत ३५.६ लाख स्क्वेअर फुटांचे भाडेकरार झाले आहेत. इंडस्ट्रियल जागांसाठी चाकण आणि तळेगाव एमआयडीसींना मोठी मागणी असून एकूण व्यवहारातील चाकणचा वाटा ६९ टक्के इतका आहे.

भाडेकरारात टाटा ऑटोकॉम्प, व्हेरॉक इंजिनीअरिंग, टीव्हीएस सप्लाय चेन यांसारख्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर आहेत. इंडस्ट्रियल रेंटमध्ये ५ ते ८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळते आहे. ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांतील बदललेल्या नियमांमुळे वेअरहाऊसिंग व्यवहार मंदावल्याचे कुशमन अँड वेकफिल्डने म्हटले आहे.

२०२२ च्या शेवटच्या सहा महिन्यांत १०.५ लाख स्क्वेअर फुटांचे भाडेकरार झाले आहेत. उत्तम प्रतीच्या वेअरहाऊसिंगची कमतरता असल्यानेही व्यवहारांत घट झाल्याचे म्हटले जाते. येत्या वर्षभरात चाकण परिसरात जवळपास २० लाख स्क्वेअर फुटांची ग्रेड ए वेअरहाऊसेस नव्याने उपलब्ध होतील, अशी माहिती मिळते.

पुण्याचे कमर्शियल हॉटस्पॉट्स

सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी)

लक्ष्मी रोड, कॅ म्प, बंड गार्डन, बोट क्लब रोड, ढोले पाटील रोड, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, एफसी रोड, जे. एम. रोड, वाकडेवाडी, सेनापती बापट रोड, मॉडेल कॉलनी, गणेशखिडं रोड

सेकंडरी बिझनेस डिस्ट्रिक्ट ईस्ट (एसबीडी ईस्ट)

कल्याणीनगर, खराडी, मुंढवा, येरवडा, नगर रोड, विमाननगर, हडपसर, कोंढवा

सेकंडरी बिझनेस डिस्ट्रिक्ट वेस्ट (एसबीडी वेस्ट)

औध, ं बाणेर, पाषाण, कोथरूड, कर्वेनगर, पौड रोड, खडकी

पेरिफेरल बिझनेस डिस्ट्रिक्ट ईस्ट (पीबीडी ईस्ट)

फु रसुंगी, वाघोली, चऱ्होली, सोलापूर रोड, सासवड रोड, कात्रज

पेरिफेरल बिझनेस डिस्ट्रिक्ट वेस्ट (पीबीडी वेस्ट)

पिंपरी, चिचं वड, भोसरी, तळवडे, ताथवडे, पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, बावधन, मुळशी, नांदेड

दृष्टिक्षेपात रिटल स्े पेसेस

  • जानेवारी ते मार्च २०२३ मधील एकू ण व्यवहार १.७७ लाख स्क्वेअर फूट

  • २०२४ पर्यंत नव्याने उपलब्ध होणारी जागा १५ लाख स्क्वेअर फू ट

दृष्टिक्षेपात इंडस्ट्रियल, वेअरहाऊसिंग

  • जुलै ते डिसें. २०२२ मधील इंडस्ट्रियल व्यवहार ३५.६ लाख स्क्वेअर फू ट

  • जुलै ते डिसें. २०२२ मधील वेअरहाऊसिंग व्यवहार १०.५ लाख स्क्वेअर फू ट

    दृष्टिक्षेपात ऑफिस स्पेसेस

  • जानेवारी ते मार्च २०२३ मधील एकू ण व्यवहार १५.७० लाख स्क्वेअर फू ट

  • २०२५ पर्यंत नव्याने उपलब्ध होणारी जागा १.६३ कोटी स्क्वेअर फू ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT