Ratan Tata luxury House esakal
Residential

Ratan Tata : कुलाबातील याच घरात रतन टाटांना पुरस्कार प्रदान केला जाईल, त्यांचं आलिशान घर तुम्ही बघितलंय का?

रतन टाटा यांच्या कुलाबातील ज्या घरी हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचं स्वरूप आतून कसं आहे चे बघुयात काही फोटोंच्या माध्यमातून.

साक्षी राऊत

Ratan Tata : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आज पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. उद्योगक्षेत्रात रतन टाटा यांचे मोलाचे योगदान आहे. अनेक तरुण त्यांच्या उद्योग कौशल्याचा आदर्श घेत आज उद्योगक्षेत्रात स्टार्टअप सुरु करताय. रतन टाटा याचं वय आणि प्रकृती यांचा विचार करता त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. उद्योगक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा उद्योगरत्न हा महाराष्ट्रातील प्रथम पुरस्कार आहे. रतन टाटा यांच्या कुलाबातील ज्या घरी हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचं स्वरूप आतून कसं आहे ते बघुयात काही फोटोंच्या माध्यमातून.

रतन टाटा यांचा मुंबईच्या कुलाबा भागात १३,५०० स्क्वेअर फुटाचा आलिशान बंगला आहे. या आलिशान घराची किंमत १५० कोटी असल्याचे सांगितले जाते. या घरात रूंद खोल्या, जिम, स्विमिंग पूल, सन डेक, बार, लाउंज यासह अनेक सुविधा आहेत.

Ratan Tata luxury House

रतन टाटा यांचे घर तीन मजली असून त्याची सात लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर दोन भाग आहेत.

Ratan Tata luxury House

पहिल्या मजल्यावर मोठे सन डेक, दोन मोठ्या बेड रूम्स, एक स्टडी रूम आहे. या सन डेकमध्ये एकावेळी ५०-६० जण बसू शकतात.

Ratan Tata luxury House

रतन टाटांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर दोन बेड रूम्स आहेत. त्यांच्या आलिशान बंगल्याचा रंग पांढरा आहे. बाहेरून हा बंगला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच तो आतूनही सुंदर आहे.

बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर मीडिया रूम आहे. या मजल्याच्या दुसऱ्या भागात एक सन डेक आणि स्विमिंग पूलही आहे. (Ratan Tata)

Ratan Tata luxury House

रतन टाटांच्या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा घर आहे. या ठिकाणी एका वेळी दहा ते बारा कार पार्क होऊ शकतात. रतन टाटांचे पूजा घर असे बांधण्यात आले आहे जिथे नैसर्गिक म्हणजेच सूर्याचा थेट प्रकाश पडतो. त्यांच्या बंगल्यातून समुद्र किनाऱ्याचा सुंदर नजारा दिसतो. (Property)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT