डेकोरेशनमधले लाईटिंग Esakal
Residential

तुमच्या घराच्या Decoration या तीन प्रकारे करा Lighting ; घराला येईल मॉर्डन लूक

अंतर्गत सजावट नवीन अथवा जुन्या घराची असो- प्रकाश योजना करणे म्हणजे जुनी लँपशेड काढून नवीन झुंबर लावणे किंवा बाजारात आकर्षक दिसणारे दिवे लावणे इतकेच नसून, त्यांचा सर्वांगाने विचार होणे आवश्यक आहे

सकाळ डिजिटल टीम

यापूर्वी अंतर्गत सजावटीतील नैसर्गिक म्हणजे सूर्यप्रकाशाचे महत्त्व आपण पाहिले. मुळात अंतर्गत सजावटीत प्रकाश योजनेचे Lighting Arrangement स्वरूप हे ती 'वास्तू' वापरत असणाऱ्या व्यक्तीच्या विचारांशी निगडित असते. जसे काही व्यक्तींना घराला मोठ्या आकाराच्या खिडक्या Windows आवडतात. तसेच काहींना लख्ख सूर्यप्रकाश Sunlight , तर काहींना मंद परावर्तित होणारा प्रकाश (कृत्रिम अथवा नैसर्गिक) जास्त आल्हाददायक वाटतो. Home Decor Tips Marathi Lighting arrangement importance in Decoration

खरे तर प्रकाश योजना Lighting Arrangement सजावटीच्या मूळ संकल्पनेतील व आराखड्यात प्रथम विचारात घेणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. घरातील Home फरशी, भिंतीची रचना व त्यावरील विविध रंग निश्चित करण्यापूर्वी प्रकाश योजनेचा विचार होणे आवश्यक आहे.

अंतर्गत सजावट नवीन अथवा जुन्या घराची असो- प्रकाश योजना करणे म्हणजे जुनी लँपशेड काढून नवीन झुंबर लावणे किंवा बाजारात आकर्षक दिसणारे दिवे लावणे इतकेच नसून, त्यांचा सर्वांगाने विचार होणे आवश्यक आहे. यात पुढील तीन  प्रकारे विचार करता येईल.

सर्वप्रथम सभोवतालच्या प्रकाशाचा विचार होणे आवश्यक आहे. यात प्रकाशाचा उगम स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे डोळ्यांना जास्त सुखकारक वाटतो. सर्वसाधारणपणे खोलीत एकसारखा प्रकाश मिळाल्यास या प्रकारच्या प्रकाश योजनेची मदत होते. अशा प्रकाश योजनेत काचेत कमी सावल्या निर्माण होतात. तसेच भिंतीचा पृष्ठभाग त्यासारखा न दिसण्यास मदत होते. या ठिकाणी कागदी दिवे अथवा कृत्रिम छताच्या रचनेत अदृश्य भासणाऱ्या दिव्यांद्वारे अशा प्रकारची प्रकाश योजना करता येते. यातही शुभ्र पांढरा प्रकाश किंवा पिवळे छत असे दोन प्रकार होऊ शकतात. यासाठी लागणारे दिव्यांचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

हे देखिल वाचा-

सर्वसाधारण प्रकाश योजनेच्या नियोजनात प्रकाशाची तीव्रता कमी अधिक करण्यासाठी 'डिमर' चा वापर केल्यास हवा तसा प्रकाश खोलीत निर्माण करता येतो. कृत्रिम छताद्वारे या प्रकारच्या प्रकाश योजनेत परावर्तित प्रकाशाचा वापर होत असल्याने, अशा रचनेत डोळ्यांवर कमी ताण पडतो.

यानंतर दुसरी प्रकाश योजना म्हणजे चित्तवेधक प्रकाश. यात एखाद्या विशिष्ट विषयावर अथवा आराखड्यात महत्त्वाच्याच संकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. यासाठी बाजारात विविध प्रकारचे REFLECTORS, HALOGEN, SPOTLIGHTS उपलब्ध आहेत. घरातील एखादा वॉल पोर्शन, शिल्प अथवा पेंटिंग यावर लक्ष केंद्रित करायचे असल्यास त्यातील रंग किंवा शैली बघून पांढऱ्या किंवा पिवळ्या प्रकाशाचा वापर करावा. तसेच वर नमूद केलेल्या सभोवतालच्या प्रकाश योजनेनुसार HIGHLIGHT LAMPS ची निवड करावी.

यापुढील प्रकाश योजनेचा प्रकार म्हणजे TASK LIGHTING. सजावटीच्या या प्रकाश योजनेच्या वापराने कार्यक्षमतेवर परिणाम होतो. दैनंदिन वापरातील नियमित गरजेची व आवश्यक अशी ही प्रकाश योजना आहे. जसे स्वयंपाकघराच्या ओट्यावर स्वच्छ, सावलीरहित व एकसारखा प्रकाश लागतो. तसेच वाचनासाठी, शिवणकामासाठी या प्रकारच्या प्रकाश योजनेचा वापर होतो. यासाठी बाजारात निरनिराळे पर्याय उपलब्ध आहेत. यात निर्णय घेताना योग्य व आवश्यक तितक्याच प्रकाश तीव्रतेची निवड करून डोळ्यांवर ताण येणार नाही याची दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT