E-Truck sakal
पुणे

E-Truck : कचरा वाहतुकीसाठी पुण्यात १० इ-ट्रक

पुणे महापालिकेने अधिकाऱ्यांसाठी इ कारचा वापर सुरू केलेला असताना आता कचरा वाहतुकीसाठी इ-ट्रक घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेने अधिकाऱ्यांसाठी इ कारचा वापर सुरू केलेला असताना आता कचरा वाहतुकीसाठी इ-ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. १० ट्रक घेण्यासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामाध्यमातून कचरा वाहतुकीसाठी इ-ट्रक विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. शहरात सध्या घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित करून तो रॅम्पवर आणला जातो. तेथून तो मोठ्या कॅम्पॅक्टरमध्ये भरून प्रकल्पांवर नेला जातो.

घंटागाडीमार्फत एका वेळेत ६०० ते ७०० किलो कचरा गोळा केला जातो व त्यासाठी प्रति किलोमीटर सुमारे ६ रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करणे व वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी इ-ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रकचा वाहतूक खर्च प्रति किलोमीटर सुमारे ७० पैसे इतका आहे व एका वेळी दीड टन कचऱ्याची वाहतूक करणे शक्य आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर २०० किलोमीटर पर्यंत हा ट्रक धावू शकतो. त्यामुळे शहराच्या सर्व भागात, कचरा रॅम्पपासून लांब असलेल्या भागातही हा ट्रक कचरा संकलनासाठी पाठविता येणे शक्य आहे.

या एका ट्रकची किंमत सुमारे १६.४५ लाख असून, जीएसटीसह याचा खर्च १.७२ कोटी पर्यंत गेला आहे. ट्रकची चार्जिंग करण्यासाठी गुलटेकडी येथील महापालिकेचा वाहन डेपो, विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT