100 to 150 rupees per kg price of marigolds in the market yard 
पुणे

 मार्केट यार्डात झेंडुची आवक; १०० ते १५० रुपये किलोचा दर

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : दसऱ्यानिमित्त फुलबाजारात झेंडू, जुईच्या फुलांचीआवक वाढली आहे. परंतु यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अवाक आणि मागणी ही कमी आहे. घाऊक बाजारात एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. तर जुईच्या एका किलोस २००० रुपये दर मिळाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा मोठा फटका झेंडुला बसला होता. त्यामुळे सुरुवातीला ओल्या फुलांची अवाक जास्त होती. परंतु ३-४ दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने सध्या चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडुला दर मिळत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्रीमध्ये देवीला वाहण्यासह, केसांमध्ये माळण्यासाठी जुई, कागड्याचा गजरा तसेच शेवंतीच्या वेणींना बाजारात मोठी मागणी असते. यामध्ये सर्वाधिक जुईच्या गजर्‍याला सर्वाधिक पसंती असते. यामुळे जुईचे दरही अधिक असतात. यंदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. त्यामुळे फुलांना मागणी कमी आहे. दसऱ्याच्या दिवशी माळा तसेच पूजनासाठी झेंडुला मोठी मागणी असल्याची माहिती मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

घाऊक आणि किरकोळ बाजारात अन्य फुलांच्या तुलनेत झेंडुच्या मागणीत वाढ होते. रात्री पासून  फूल बाजारात झेंडुची आवक सुरू झाली आहे.काही वर्षांपूर्वी कोलकात्ता भागातून झेंडुची आवक व्हायची. या झेंडुला कोलकात्ता झेंडू असे म्हणतात. कोलकात्ता झेंडुची लागवड आता राज्यातील शेतकरी करत आहेत. कोलकात्ता झेंडू आकाराने लहान असतो. कोलकात्ता झेंडुला प्रतवारीनुसार १०० ते १३० रुपये असा भाव मिळाला आहे. साध्या झेंडुला १०० ते १५० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला आहे.

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या स्वागताला झेंडूची मोठी मागणी असते. पावसाने विश्रांती दिल्याने कालपासून काही प्रमाणात चांगल्या फुलांची आवक होत आहे. तसेच दर वाढल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे.
- अरूण वीर, अध्यक्ष, अखिल फुलबाजार अडते असोसिएशन

येथून झाली आवक

सातारा जिल्ह्यातील वाई, बावधन, सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हवेली तालुक्यातील गावे तसेच बुलढाणा भागातून झेंडुची आवक होत आहे.

पुणेकरांच्या दुपारी झोपण्याच्या सवयीवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला; दिले मोदींचे उदाहरण

फूल बाजारातील शनिवारी झालेली अवाक आणि उलाढाल

फुले -    - अवाक क्विंटल -     उलाढाल

झेंडू     -   ११६८. २०     -     ९३४५६००
कागडा  -   ४.३९           -      ३०७३००
जुई   -    ०.४९             -      ७८४००
गुलछडी -  ४६.७१         -    १७७४९८०
गुलाब गड्डी -  ९.४९       -     १८९८४०
जरबेरा    -   १४.७६      -     २३६१६०
इतर सर्व फुले - ३७१.२६ -  ६४५३८८५

एकूण अवाक  - १६१५.२ - १८३८६१६५

शेवंती १५० ते २०० रुपये किलो
यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवात शेवंतीच्या फुलांना एक किलो शेवंतीची विक्री १५० ते २०० रुपये दराने करण्यात आली. गतवर्षी शेवंतीला १०० ते १५० रुपये असा भाव मिळाला होता, अशी माहिती फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

जुई - २००० रुपये किलो
बाजारात जुईची फक्त फक्त २२-२३ किलो झाली. आवक खूपच कमी असल्याने जुईचे भाव वाढले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT