pune sakal
पुणे

शिवणे कोंढवे परिसरात पालिकेच्या हौदात १०० टक्के विसर्जन

पालिका व पोलिस यांनी एकत्रित काम केल्याने पर्यावरण जपण्यास झाली मदत

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : महापालिकेने श्रीगणपती विसर्जनासाठी हौद उपलब्ध करून दिले. उत्तमनगर पोलिसांनी आवाहन केले यामुळे शिवणे उत्तमनगर कोंढवे-धावडे व न्यू कोपरे या परिसरातील सुमारे १०० टक्के गणपतीचे विसर्जन पालिकेच्या हौदात झाले. परिणामी यंदा मोठ्या संख्येने पर्यावरण जपण्यास मदत झाली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिवणे येथे दोन हजार १७० श्रींचे विसर्जन पालिकेच्या हौदात झाले. या ठिकाणी तीन हजार ३०० किलो निर्माल्य जमा झाले आहे. उत्तमनगर याठिकाणी ८२५ गणपतींचे हौदात विसर्जन झाले याठिकाणी एक हजार २४० किलो निर्माल्य जमा झाले कोंढवे-धावडे याठिकाणी ९५०गणपतींचे तर कोपरे गावात १५० गणपतींचे विसर्जन पालिका हौदात विसर्जन झाले. या दोन्ही गावांमध्ये एक हजार ६०० किलो निर्माल्य जमा झाले. अशाप्रकारे या चारही गावांमध्ये चार हजार ०९५ गणपतींचे विसर्जन पालिकेच्या बस झाले तर पाच हजार १५० किलो निर्माल्य या ठिकाणी जमा झालेला आहे.

उत्तमनगर पोलिसांनी खडकवासला धरण परिसरात आणि धरण परिसरात जाणाऱ्या वाहनांसाठी बंदोबस्त ठेवला होता. त्यांचे प्रबोधन केले जात होते. धरणात व नदीच्या पात्रात जाण्याचे रस्ते बंदिस्त केली होते. बांबू लावले होते. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी धरण परिसरात नदीपात्रात कोणीच फिरकले नाही.

त्याचबरोबर यासंदर्भात पोलीस निरीक्षक सुनील वैजापूरकर यांनी सोशल मीडियाचा वापर करत गणपती श्रींच्या मूर्तीचे विसर्जन हे पालिकेच्या हौदात करण्याचं आवाहन केलं होते. त्यास या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

उत्तमनगर, शिवणे या ठिकाणी निर्माल्य देण्यासाठी प्लास्टिकच्या मोठ्या बादल्या ठेवल्या होत्या. त्यात जमा झालेला कचरा त्यात जमा झालेले निर्माल्य घंटागाडी कचऱ्या गाडीमध्ये भरून नेला जात होता. कचरा जमा करण्याचे टेम्पो, घंटा गाडीमधून नेला. यागाड्या अगोदर स्वच्छ धुवुन आणल्या होत्या. निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश असतात त्याप्रमाणे निर्माल्य कलश याठिकाणी असले पाहिजेत अशी नागरिकांची मागणी होती.

कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर व कोपरे गावात जिल्हा परिषद शाळा याठिकाणी विसर्जन हौद ठेवले होते. कोंढवे धावडे येथील विसर्जन हौद मुख्य रस्त्यावर होता. यामुळे, भाविक वाहने घेऊन येत होते. आरती करणे, विसर्जन करणे, निर्माल्य देण्यासाठी गर्दी होत होती. परिणामी मुख्य रस्त्यावरील वाहतूक संथ होत होती. माहिती फलकांचा अभाव दिसून आला. गणपती विसर्जन हौद, आरती कोठे करायची आणि निर्माल्य कोठे द्यायचे याचे माहिती फलक असणे गरजेचे आहे. अशा सूचना भाविकांच्या होत्या.

पालिका व पोलिसांनी केलेल्या आवाहन यामुळे पालिकेच्या हौदात श्रींचे विसर्जन झाले. यूएस नागरिकांनी कोठेच विरोध झाला नाही. हौदात विसर्जन झालेल्या मुर्त्या एकत्रितरीत्या वाघोलीतील खाणीत विसर्जनासाठी पाठविण्यात येत होत्या.

- मधुकर कारकुड, विभागीय आरोग्य निरीक्षक

उत्तमनगर पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवला होता. मूर्ती हौदात विसर्जन करणे निर्माल्य पाण्यात टाकू नये असे आवाहन केले होते. त्यानुसार, सर्व नागरीकांनी उदंड प्रतिसाद दिला.

-सुनील जैतापूरकर, पोलिस निरीक्षक उत्तमनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT