पुणे

शिरुर तालुक्यात लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे - रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात सोमवारी (ता. ६) लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळाला. शिरूर पंचायत समितीतर्फे जिल्हा परिषद गटनिहाय सुरु केलेल्या  लॉकडाऊनला आज १४ गावातील नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने १०० टक्के लॉकडाऊन केल्याची परिस्थिती सर्वत्र दिसली.  तशेच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानालाही दिवे लाऊन नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

दरम्यान, आज झालेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा परिषद गटातील तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, करंजावणे, भांबर्डे, दहिवडी, उरळगाव, रांजणगाव सांडस, आलेगाव पागा आदी गावात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळून सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले होते. या जिल्हा परिषद गटात एकही कोरोनाचा रुग्ण अद्याप आढळला नसला तरी सर्वच गावात लॉक डाऊन करून प्रतिबंध करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.  पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस, आरोग्य विभाग, पोलीस पाटील आदींनी गावागावात लॉकडाऊनचे आतापर्यंत उत्कृष्ट नियोजन केले आहे.  

दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, घरात बसून कुटुंबाची काळजी घेण्याचे  आवाहन आमदार ऍड. अशोक पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT