Corona-patient Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ८ मृत्यू; तर दहा हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात रविवारी (ता. १६) सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात रविवारी (ता. १६) सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) रविवारी (ता. १६) सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. शनिवारी (ता. १५) जिल्ह्यात १० हजार २८१ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. हाच आकडा शुक्रवारी (ता.१४) दहा हजार ७६ इतका होता. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १० हजार १०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ५ हजार ३७५ जण आहेत.

याऊलट सलग दुसऱ्या दिवशी दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत निम्‍याहून कमी कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी ५ हजार ४०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय रविवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची हीच संख्या शनिवारी (ता.१५ ) पाच होती. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारीच्या अहवालातून हे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ६२६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ५०५, नगरपालिका हद्दीत ३८४, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २१२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ३ हजार ९०, पिंपरी चिंचवडमधील १ हहजार५३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५८८, नगरपालिका हद्दीतील १६१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३१ जण आहेत. दिवसातील एकूण कोरोना मृत्यूमध्ये पुणे शहरातील पाच, पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलचं T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान न मिळण्यावर मोठं विधान; म्हणाला, निवड समितीने...

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण; छाननी समिती कशासाठी?

Nashik News : तुमच्या खिशातील चिल्लर तुम्हाला बनवू शकते लखपती? नाशिकमध्ये नाणी-नोटांच्या खरेदी-विक्रीची धूम

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT