पुणे : पुण्यातील कोरोना रुग्णांचा शंभरीचा आकडा दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारीही (ता.24) कायम राहिला. अगदी गुरुवार इतकेच 104 रुग्ण शुक्रवारी सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या टप्प्यात आली असून, ती संख्या 980 पर्यंत पोहोचली आहे. तर दुसरीकडे 16 रुग्ण बरे झाले असून चौघांचा मृत्यू झाल्याने ती संख्या 64 झाली आहे. या साऱ्यात आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे, 41 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
शहरातील नव्या रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून, सलग दुसऱ्या दिवशी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, पेठांच्या भागांतही हे रुग्ण वाढल्याचे सांगण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतील सुमारे 6 हजार 181 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यातील 5 हजार 264 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 980 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, गेल्या आठवडाभरात मात्र कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही 146 इतकी झाली आहे. सध्या 'रेड झोन'मधील घराघरांत जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत आहे.
पर्वती दर्शन येथील 61 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांना त्रास होत असल्याने 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांना अन्य स्वरुपाचे आजार होते.
शिक्रापूर येथील 40 वर्षांच्या पुरुषाला कोरोना झाल्याने गुरुवारी (ता.23) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता.
पुण्यात गुरुवारी सापडलेले रुग्ण | 104 |
एकूण रुग्ण | 980 |
गुरुवारी बरे झालेले रुग्ण | 14 |
आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण | 146 |
मृत | 4 |
एकूण मृत | 64 |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.