दहावी, बारावीच्या परीक्षा 
पुणे

दहावी-बारावीच्या परीक्षा गरजेची; शिक्षणतज्ज्ञांचे मत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : विद्यार्थ्यांच्या करिअरचा शैक्षणिकदृष्ट्या विचार करता, दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइनच होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याऐवजी त्या पुढे ढकलले योग्य आहे. परंतु बोर्डाच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. त्यावर विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश अवलंबून आहे, अशी मते मांडत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी बोर्डाच्या परीक्षा झाल्याच पाहिजे, असे मत ठामपणे मांडले.

शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून, शैक्षणिक दृष्टिकोनातून बोर्डाच्या परीक्षेबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच परीक्षा ऑफलाइन घेणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार करून, ‘परीक्षा होतील आणि ऑफलाइनच होतील’ हे ठामपणे सांगायला हवे. अन्यथा परीक्षा न झाल्यास विद्यार्थ्यांवर परीक्षा न देता उत्तीर्ण झालेले म्हणून ठपका बसेल. त्याशिवाय परीक्षा न घेतल्यास पुढील प्रवेश प्रक्रिया करता येणार नाहीत. या सगळ्यांचा विचार करून, राज्य सरकारने कोरोनाच्या संकट काळातही परीक्षा घेण्यासाठी ठराविक असा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ करायला हवा.’

सिटी इंटरनॅशनलच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई म्हणाल्या,‘‘बोर्डाच्या विशेष करून दहावी-बारावीच्या गुणपत्रिका आयुष्यभर महत्त्वाच्या असतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्ग आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात काहीच गैर नाही. पण त्या रद्द करणे योग्य नाही. निदान बोर्डाच्या परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवायला हवा. दहावी-बारावीची गुणपत्रिका त्यावर पुढील प्रवेश अवलंबून असतात. बारावीच्या गुणपत्रिकेवर उच्च शिक्षण आणि अनेक नोकऱ्या अवलंबून असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा आहे, त्यांना तरी परीक्षेची संधी द्यायला हवी. सीईटी, जेईई, नीट अशा विविध परीक्षा आणि पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी या परीक्षांना महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे योग्य आहे, पण रद्द करणे अयोग्य ठरेल.’’

विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची तयारी झालेली असून, त्यांनाही परीक्षा हवी असल्याचे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘राज्य सरकार, तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि अन्य राज्यातील शिक्षण मंडळे बारावीच्या परीक्षा रद्द न करण्याच्या तयारीत आहेत. मग बारावीच्या परीक्षा होत असतील, तर दहावीच्या परीक्षा होणे आणि त्याही ऑफलाइन होणे गरजेचे आहे. परीक्षा कधी, किती गुणांच्या घ्यायच्या याबद्दल मतांतंरे होतील. पण परीक्षा होणे गरजेचे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT