महाविद्यालयात झालेली विद्यार्थ्यांची गर्दी. sakal
पुणे

11 th Admission : पुण्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एक लाख १३ हजार जागा, प्रवेशासाठी ८७ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

पहिली गुणवत्ता यादी बुधवारी होणार जाहीर

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

11 th Admission - इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख १३ हजार ३९० जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी आतापर्यंत ८७ हजार २३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

तर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत (कॅप) ८८ हजार ४१३ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी (ता.२१) जाहीर होणार आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ३२४ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत ८७ हजार २३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. महाविद्यालयांमधील कोट्यातंर्गत प्रवेशासाठी २४ हजार ९७७ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिल्या नियमित फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून गुणवत्ता यादी आणि निवड यादी येत्या बुधवारी सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत कोट्यांतर्गत राखीव जागा महाविद्यालयांनी समर्पित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतंर्गत कोट्यांतर्गत जागा समर्पित झाल्यानंतर ‘कॅप’ फेरीतील प्रवेशाच्या जागा वाढण्याची चिन्हे आहेत.

इन्फोबॉक्स -

प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थी :

ऑनलाइन नोंदणी केलेले : ८७,२३८

अर्ज लॉक केलेले : ७३,९८५

ॲटो व्हेरीफाय झालेले अर्ज : ३४,७०४

‘कॅप’ फेरीसाठी पर्याय निवडलेले : ६५,९९६

अकरावीसाठी प्रवेश क्षमता -

- एकूण प्रवेश क्षमता : १,१३,३९०

- कॅप अंतर्गत प्रवेश क्षमता : ८८,४१३

- कोट्यातंर्गत प्रवेश क्षमता : २४,९७७

- कोट्यांतर्गत झालेले प्रवेश : ३,०५७

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक -

तपशील : कालावधी

- पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करणे, अलॉटमेंट यादी जाहीर करणे : २१ जून (सकाळी दहा वाजता)

- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे : २१ ते २४ जूनपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : विक्रम मोडणार! २६ लाख दिव्यांसह इतिहास रचणाऱ्या दीपोत्सवाची भव्य तयारी सुरू

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

Jalgaon News : जळगावकरांची दिवाळी खड्ड्यांतच! महामार्गावरील बिकट अवस्थेमुळे अपघात व धुळीचा त्रास

Pune River Pollution : पुण्यातील लकडी पुलाखाली राडारोडा टाकण्याची घटना, महापालिकेचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT