11 year old boy died after privet part injury during playing cricket in lohegaon  
पुणे

Pune News : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागून चिमुरड्याचा मृत्यू! पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News : या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहित कणसे

Death of 11 year old while playing cricket : देशात सध्या इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे. यादरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील लोहगाव परिसरात मित्रांसोबत क्रिकेट खेळताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव भागात ही घटना घडली. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे, असं मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,

पुण्यातील लोहगाव भागात शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. यादरम्यान मित्रांसोबत खेळतांना चेंडू शंभुच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला.

काही वेळानंतर तो उठून उभा राहिला. मात्र , वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर कोसळला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT