Lawrence Bishnoi Latest News 
पुणे

पुणे ग्रामीणमधून धक्कादायक बातमी, ११ तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात

पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आता मोठे आव्हान तयार झाले असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आता मोठे आव्हान तयार झाले असल्याचे बोलले जात आहे.

पुणे शहरासह ग्रामीण भागांतील काही भागांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सिद्धेश उर्फ सौरभ महाकाळ याला अटक केली. महाकाळ याच्याकडे अधिकचा तपास केला असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. (Lawrence Bishnoi Latest News)

पुणे ग्रामीण भागातील अकरा तरूण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण पुणे भागात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय पोलिसांनीही याप्रकरणी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आता मोठे आव्हान तयार झाले असल्याचे बोलले जात आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागातील ११ तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील अल्पवयीन तरुणाईला गुन्हेगारी क्षेत्राकडे खेचण्याचा प्रयत्न या गँगकडुन केला जात आहे का? असा सवालही याप्रकरणी उपस्थित होत आहे. त्यामुळे आता या तरूणांचा शोध घेण्याचे आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे.

पंजाबमधील प्रसिध्द गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात बिश्नोईचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. याच प्रकरणात कांबळेसह कुख्यात गुंड संतोष जाधवलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशी अकरा तरूणांबाबत माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान व त्याच्या वडिलांनाही बिश्नोई गँगने धमकी दिली आहे.

दरम्यान, कुख्यात बिश्नोई हा सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला पहिल्यांदा 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. लॉरेन्सचा जन्म पंजाबचा आहे. महाविद्यालयीन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. नंतर त्याचे नाव गँगवारमध्ये समोर येऊ लागले. सध्या देशातील विविध राज्यांमध्ये त्याची गँग सक्रीय असल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT