Students_Convocation 
पुणे

पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी; ७०३५ विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी (ता.३) संध्याकाळी ४.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, फोर्ब्स मार्शल प्रा.लि.चे सहअध्यक्ष डॉ. नौशाद डी. फोर्ब्स हे प्रमुख अतिथी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणार आहेत. तसेच स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित राहणार आहेत. 

२०१८-१९ मध्ये आणि तत्पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७ हजार ३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी १०४ पीएच.डी. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत. सदर पीएच.डी. विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सध्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पुढील १५ दिवसांमध्ये पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.

पदवीप्रदान समारंभ पुढील लिंकवर पाहता येईल : 
http://webcast.unipune.ac.in/convocationSep2020/

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

Year End Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला मोठं फळ देणारा योग! कल्याणासाठी ‘या’ वस्तू दान करायला विसरू नका

Ashes Series : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली; दोन दिवसांत सामना संपल्यामुळे नुकसानीची भीती

Pune Municipal Election : मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या मुलांचे पत्ते कट; शनिवारी रात्री आले आदेश

SCROLL FOR NEXT