An 12 year old girl who left her home due to mother angry at her returned due to a grandmother  
पुणे

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...

सकाळवृत्तसेवा

कामशेत : आई रागावली म्हणून कुणालाही काही न सांगता रागाच्या भरात घराबाहेर पडलेली, एक १२ वर्षीय मुलगी पुणे ते मुंबई असा लोकलने प्रवास करताना एका आजीस आढळली. त्या आजीने तिची समजूत काढून तिला आपल्याबरोबर कामशेत रेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवल्याने, या मुलीची तिच्या आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली. अनुराधा गाडे असं या मुलीचं नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमार घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा तिच्या मागील काही वर्षांपासून मुंबईमध्ये तिच्या आजीकडे राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती पुण्यातील हडपसर भागात राहत असलेल्या तिच्या आईकडे आली होती. मात्र, बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते असं सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली. यावेळी ती जार भांबवलेली होती, तिच्याकडे मोबाइल देखील नव्हता. हे पाहून याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिची चौकशी केली, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. परिस्थिती लक्षात आल्याने त्या महिलने तिला मी तुला बसमध्ये बसवून देते तू रेल्वेने एकटी प्रवास करू नको असे सांगून, आपल्याबरोबर घेतले, यानंतर कामशेत रेल्वेस्थानक आल्यावर तेथील रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवलं. तेथील महिला रेल्वे पोलीस कर्मचारी एस. मोहिते यांनी मुलीची सविस्तर माहिती घेतली व तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधुन तिला त्यांच्या स्वाधीन केलं.

किरकोळ वादातून कांदा कापण्याच्या सुरीने भोसकून खून ट्रकचालकाचा खून

एकटी अनुराधा मुंबईत पोहचली असती व तिला जर आपल्या पालकांशी संपर्क साधता आला नसता तर कुठलीही चुकीची घटना तिच्या बरोबर घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नव्हती. तिला अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागले असते, मात्र रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका आजीच्या दक्षतेमुळे आज ती पुन्हा तिच्या आई-वडिलांकडे परतली आहे. दरम्यान, आई वडिलांनी मुलांना रागावल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ते रागाच्या भरात अनेक गोष्टी करू शकतात, असं आवाहन महिला रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी  केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT