138 villages of Baramati mandal will get daytime electricity devendra fadnavis marathi news sakal
पुणे

Baramati News : बारामती मंडलातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

पुणे जिल्ह्यात 221 मेगावॅट सौर वीजनिर्मिती होणार

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होत आहे. यातून पुणे जिल्ह्यात 221 मेगावॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील 41 उपकेंद्रांतर्गत सरकारी गायरान जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे.

बारामती मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व शिरुर या 5 तालुक्यातील 138 गावांमधील 67 हजार शेतीपंप ग्राहकांना याचा फायदा होणार असून, त्यांना दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली आहे.

त्यासाठी ‘एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लि.’ही कंपनी स्थापन केली आहे. पहिल्या टप्प्यांत सरकारी पडीक गायरान जमीनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी सोलार कंपनीने अकोला, बुलढाणा, वाशीम, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना, जळगाव व नांदेड या 9 जिल्ह्यांची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यांत 221 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होईल. त्याकरिता जवळपास 1091 एकर जागेची आवश्यकता असून या जमिनी 1 रुपया वार्षिक भाडेपोटी 30 वर्षांच्या करारावर शासनाकडून मिळाल्या आहेत.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे ही शासनाची भूमिका असल्याने गायरान जमिनी हस्तांतरण करणेकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला मोलाची साथ दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीही जमीन हस्तांतरणास मदत केल्याचे सुनील पावडे यांनी सांगितले.

41 पैकी 23 उपकेंद्र बारामती अंतर्गत तर उर्वरित पुणे परिमंडलात येतात. 10 उपकेंद्रांना त्यांच्या संपूर्ण क्षमते इतक्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये बारामती मंडलात लोणी देवकर व बाभुळगाव उपकेंद्रांतर्गत अनुक्रमे 20.16 व 9.38 मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून त्याकरिता अनुक्रमे 100 व 45 एकर जमीन करारावर उपलब्ध झाली आहे. तर उर्वरित 21 उपकेंद्रांना 440 एकर अशी मिळून तब्ब्ल 586 एकर जमीन महावितरणला मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT