Sugar Production  sakal
पुणे

Sugar Production : जिल्ह्यात १३२ लाख टनांमुळे वाढला गोडवा ; हंगामात १३९ लाख क्विंटल साखरनिर्मिती; सोमेश्वर, विघ्नहरची उताऱ्यात बाजी

पुणे जिल्ह्याचा साखर हंगाम संपला आहे. चौदा कारखान्यांनी मिळून अनपेक्षितपणे तब्बल १३२ लाख टनांचे गाळप केले असून, १३९ लाख क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : पुणे जिल्ह्याचा साखर हंगाम संपला आहे. चौदा कारखान्यांनी मिळून अनपेक्षितपणे तब्बल १३२ लाख टनांचे गाळप केले असून, १३९ लाख क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. सरासरी साखर उतारा मागील हंगामाच्या तुलनेत ०.५८ ने वाढून १०.५७ टक्के झाला आहे. त्यामुळे गत हंगामाच्या तुलनेत साखरनिर्मितीत १३ लाख ४३ हजार क्विंटलची वाढ झाली आहे. दरम्यान, गाळपात बारामती अॅग्रो, दौंड शुगर यांनी, तर साखर उताऱ्यात सोमेश्वर, विघ्नहर यांनी बाजी मारली आहे.

उसटंचाई असतानाही महाराष्ट्रात चालू हंगामात २०७ कारखान्यांनी १०७१ लाख टन ऊसगाळप करत १०.२६ टक्के साखर उताऱ्याने १०१ लाख टन साखरनिर्मिती केली आहे. तर पुणे जिल्ह्यानेही हंगामपूर्व अंदाज चुकवून १३२ लाख ४१ हजार ३९२ टन गाळप केले आहे.सरासरी साखर उतारा १०.५७ टक्के असून, साखरनिर्मिती १३९ लाख ९३ हजार ५०७ क्विंटल झाली आहे.

गतहंगामात जिल्ह्यात १२६ लाख ९१ हजार टन गाळप, उतारा ९.९९ टक्के आणि साखरनिर्मिती १२६ लाख क्विंटल होती. एकरी उत्पन्नात वाढ आणि पुरेशी थंडी यामुळे अंदाज चुकल्याने एप्रिलअखेर हंगाम सुरू राहिला आणि साखरेचा गोडवा वाढला. साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी (११.१५ टक्के) खासगीच्या तुलनेत मोठी बाजी मारल्याने सहकारातील शेतकऱ्यांना अधिकची एफआरपी मिळणार आहे.

साखर उताऱ्यात ‘सोमेश्वर’, गाळपात ‘बारामती’ अव्वल

साखर उताऱ्याबाबत नऊपैकी आठव्या वर्षी 'सोमेश्वर'ने (११.९२ टक्के) अव्वल स्थान पटकावले आहे. पाठोपाठ विघ्नहर (११.५६), संत तुकाराम (११.५२), माळेगाव (११.४७), भीमाशंकर (११.४६), पराग अॅग्रो (११.१०), व्यंकटेश कृपा (१०.९६) यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. गाळपात बारामती अॅग्रोने विक्रमी २१ लाख टन, दौंड शुगरने १८ लाख टन तर सोमेश्वरने १५ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. या रांगेत माळेगावने तेरा लाख, भीमाशंकरने अकरा लाख, विघ्नहरने दहा लाख टनांचा टप्पा ओलांडत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रांची अधिकृत घोषणा

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

Viral Video : शिक्षक की हैवान? दिव्यांग मुलाला पाइपने बेदम मारहाण, डोळ्यात फेकली मिरची पावडर; व्हिडिओ पाहून रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही

Shubman Gill: शुभमन गिलची संघात झाली निवड; अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा यांच्यासोबत खेळताना दिसणार; न्यूझीलंडविरुद्ध...

Heart Attack Risks: तुमच्या आरोग्याशी संबंधित 'हे' ४ घटक ठरतायत हृदयाचे शत्रू; ९९% भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका! आजच तपासा

SCROLL FOR NEXT