Untitled-13.jpg 
पुणे

दिलासादायक : पुण्यात दिवसभरात तब्बल 144 रुग्ण झाले बरे

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही वाढत असल्याचे आकडे पुढे येत असून, शुक्रवारी दिवसभरात तब्बल 144 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांपैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक म्हणजे, 1 हजार 630 रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात 106 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर; पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने पावणेदोनशे रुग्णांचे बळी घेतले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेले 132 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 33 जण व्हेंटिलेटरवर असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तपासणीचा वेग वाढवून रोज किमान दीड हजार नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. याआधी ही संख्या साडेसहा ते सातशेपर्यंत होती. मात्र, आता "स्वॅब' घेण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढल्याने रुग्ण संख्येत भर पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 1 हजार 652 जणाची शुक्रवारी दिवसभरात तपासणी झाली असून, त्यातील 106 नागरिकांना कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. 

शहरात नऊ मार्चपासून आजपर्यंत 3 हजार 93 नागरिकांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील 1 हजार 630 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत सध्या 1 हजार 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या अजूनही काही प्रमाणात मृत्यू होत आहेत. ते रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT