cyber crime  sakal
पुणे

पुणे : सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ लाखांना गंडा

कोथरूड पोलिस ठाण्यात दोन आणि विमानतळ पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सायबर चोरट्यांनी विविध प्रकारचे आमिष दाखवत वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना १५ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात दोन आणि विमानतळ पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.एका युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी त्यांना चोरट्यांनी फोनवर संपर्क केला. दिल्लीतील एका खासगी आयुर्विमा कंपनीतून बोलत असून तुमच्या पॉलिसीचे दोन हप्ते बाकी आहे. हप्ते भरल्यास ११ लाख ४० हजार रुपये मिळतील, असे आमिष सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला दाखविले होते.(Cyber thieves lure citizens)

तक्रारदाराला एका बँक खात्यात चोरट्यांनी दोन लाख ९० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी मोबाईल क्रमांक बंद केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बढे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.आयुर्विमा पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याच्या आमिषाने कोथरूडमधील एका ज्येष्ठ महिलेला चोरट्यांनी सात लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी दिल्लीतील आयुर्विमा कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली होती. पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी तातडीने हप्ते भरा. हप्ते भरल्यास ३१ लाख रुपये मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखवून महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून रोकड लांबविली.(cyber news)

तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी एका युवकाला परदेशात नोकरीच्या आमिषाने पाच लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत एका युवकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराला कॅनडातील एका कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून पाच लाख ६० हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक एल. एस. उर्किडे तपास करीत आहेत.(cyber crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT