corona.jpg
corona.jpg 
पुणे

शिरूर तालुक्यातील संसर्गाचा आकडा पाहा; शिरूरकरांनो सावधान!

सकाळवृत्तसेवा

शिरूर  : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला तोंड देणा-या शिरूर तालुक्याला सोमवारी मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात नव्याने बाधित सापडला नसला़; तरी तालुक्यातील बाधितांची संख्या दीडशेच्या घरात गेली. सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कामगाराचा रिपोर्ट मात्र पॉझिव्हटि आला.

दरम्यान, २४ मार्चला शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला होता. त्यानंतर शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे वगळता इतरत्र फारसा प्रादूर्भाव झाला नव्हता. त्यानंतर, महिनाभराच्या अंतराने मात्र कोरोनाबाधितांचा वेग वाढून, गेल्या आठवड्यात कोरोनाचे तब्बल सत्तर रूग्ण आढळले होते. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच भागात भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आरोग्य यंत्रणा वेगात हलली होती.

तालुक्याच्या विविध भागातून जवळपास दीडशे जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. त्यातील शंभर जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला होता. तालुक्याच्या विविध भागातील ४४ जणांच्या स्वॅबचे रिपोट उद्या प्राप्त होणार असून, त्या अहवालातून उपाययोजनांसंबंधीचे कठोर नियोजन केले जाईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. आज दिवसभरात आलेल्या रिपोर्ट मधून सणसवाडी येथील एका ३५ वर्षीय कामगाराचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, सणसवाडीतील बाधितांची संख्या ३३ वर गेली असल्याचे त्यांनी सांगितले. शहर व तालुक्यातील बाधितांनी आज दीडशेचा टप्पा गाठला असून, आज तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला. आत्तापयर्यंत कोरोनामुळे पाच ज्येष्ठांचा मृत्यु झाला असून गेल्या महिनाभरात बळी गेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या दोन दिवसात शहरात अचानक प्रादूर्भाव वाढून दोन दिवसांत दहाजण बाधित झाले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. शहरातील बाधितांच्या संपर्कात आलेल्या शंभर जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून गुरूवारी त्यांच्यातील ज्यांच्यात तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळतील, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले जाणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

शिरूर तहसिल कार्यालयातील एका नायब तहसिलदारांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर संबंधित अधिकारी रजेवर गेले होते. ते उरळी कांचन येथे राहावयास असून, त्यांच्या मुलावर तेथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार चालू आहेत. दरम्यान, कालपासून या नायब तहसिलदारांनाही सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. याबाबत येथील तहसिल कार्यालयात माहिती समजताच अधिकारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले. आज अनेक कर्मचारी वर्गाने कार्यालयाकडे पाठ फिरवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT