Corona Test
Corona Test Sakal media
पुणे

पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १७७ नवे कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१४) दिवसभरात १७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७१ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील तीन जणांचा दिवसभरात कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुणे शहरात दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. एकूण मृत्यूमध्ये पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यू आहेत.

दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ४४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५०, नगरपालिका हद्दीत ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसात जिल्ह्यातील १९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ९० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४९, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ६४७ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मिळून ५७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ७१ जण गृह विलगीकरणात आहेत. पुणे शहरात आता ७३९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २८९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु असून, उर्वरित ४५० जण गृह विलगीकरणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT