commits suicide sakal
पुणे

वाघोली : भीमा नदीत उडी मारून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

वाघोली पीएमआरडीए अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढला

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : भीमा नदीत (Bhima river) उडी मारून 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या (suicide) केल्याचा प्रकार पेरणे फाटा येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढला.दीपक जितेंद्र रायपुरे ( वय १९, रा पेरणेफाटा ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.(19 year old commits suicide jumping into Bhima river)

तो कंपनीच्या ड्रेसवरच होता. सकाळी घरातून निघाल्यानंतर त्याने सरळ पेरणे फाटा येथील भीमा नदी गाठत नदीत उडी मारली. तो कारेगाव ( ता शिरूर ) येथील एक कंपनीत काम करत होता. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अग्निशमन विभागातील उपस्थानक आधिकारी विजय महाजन, वाहन चालक नितीन माने, मयूर गोसावी, महेश पाटील, संदीप तांबे, अक्षय बागल, मुस्ताक तडवी, तेजस डांगरे या कर्मचाऱ्यांनी दोन तासातच मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिममध्ये शिवसेनेत बंडखोरी; जाणावळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT