Vaccination Sakal
पुणे

पुणे शहरात आज १९३ ठिकाणी लसीकरण; जाणून घ्या कुठल्या केंद्रावर कोणती लस

केंद्र सरकारने १८ वयाच्या पुढील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे जाहीर केल्यानतंर उद्या (ता. २३) पासून शहरात या गटासाठीचे लसीकरण सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र सरकारने (Central Government) १८ वयाच्या पुढील नागरिकांचे मोफत लसीकरण (Free Vaccination) करण्याचे जाहीर केल्यानतंर उद्या (ता. २३) पासून शहरात या गटासाठीचे लसीकरण सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पुण्यात बुधवारी १९३ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. १२५ ठिकाणी कोव्हीशील्डच्या (Covishield) ४५ ते पुढील वयोगटासाठी नियोजन केले आहे. ५३ ठिकाणी कोव्हीशील्डत्या १८ ते ४४ वयोगटासाठी तर १५ ठिकाणी कोव्हॅक्सीनच्या (Covaxin) १८ ते पुढील वयोगटासाठीचे नियोजन केले आहे. या प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली. (193 Places Vaccine in Pune City)

कोव्हीशील्ड (४५ ते पुढील वयोगट)

- ज्यांनी ३१ मार्च पूर्वी पहिला डोस (८४ दिवस) घेतला आहे त्यांना २० टक्के लस ऑनलाईन नोंदणी द्वारे उपलब्ध.

- फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस राखीव

- ३० टक्के लस ऑनलाईन नोंदणी करून आलेल्यांच्या पहिल्या डोससाठी

- ३० टक्के लस फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी राखीव

- ऑनलाईन बुकिंग सकाळी ८ वाजता सुरू होईल

कोव्हीशील्ड (१८ ते ४४ वयोगट)

- ७० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- ३० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

कोव्हॅक्सीन (१८ ते पुढील वयोगट)

- २५ मे पूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणार

-५० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT