पुणे

पहिली ते सातवी वर्ग सुरू; विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्के

कोरोना मुळे तब्बल पावणेदोन वर्षापासुन शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : पुणे शहर (pune city )सह उपनगर भागात कोरोना (corona) संदर्भातील प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत काल ( ता.16 ) शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते .काल पहिल्या दिवशी नगररोड भागातील पहिली ते सातवी पुणे मनपाच्या(pmc) एकूण 19 शाळा सुरू झाल्या तर याच परिसरातील 50 खासगी शाळा पैकी 25 शाळा सुरू झाल्या.

कोरोना मुळे तब्बल पावणेदोन वर्षापासुन शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्ण संख्येत घट होऊ लागल्याने कडक निर्बंध शिथिल करण्यात आले. सर्व व्यवहार सुरू झाले. अनेक महिन्या पासुन घर बसल्या मुलांना शाळे कडून ऑनलाईन शिक्षण सुरू होते.अभ्यासात येणार्‍या अडचणी मुलांना भासत होत्या. प्रत्यक्ष वर्गात बसुन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावे यावर पालकांचा भर होता. त्यां अनुषंगाने शाळा सुरू झाल्या त्या आधी पालकां कडून संमतीपत्र आल्यानंतर विद्यार्थ्यांना काल शाळेत प्रवेश दिला जात होता.

रोजच्या रोज वर्ग सॅनिटायझर केला जातो. चार तास शाळा सुरू आहे. एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात आले आहे विद्यार्थ्यांना मास्क , थर्मल टेस्ट ,सॅनिटायझर, साबण ,पाणी सोय करण्यात आल्याचे सुंदरबाई विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी सांगितले. सुवर्णा लोणकर म्हणाल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण अद्याप न झाल्याने पालकां मध्ये आपल्या पाल्या विषय चेहर्‍यावर एक प्रकार ची चिंता वाटत आहे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस मात्र आनंदात गेला.

- एम जाधव. सहाय्यक शिक्षण प्रमुख , नगररोड विभाग

काल नगररोड परिसरातील पुणे मनपा पहिली ते सातवी इयत्ता च्या 19 शाळा सुरू झाल्या तर खासगी 50 पैकी 25 शाळा सुरू झाल्या असून उर्वरित शाळा या नाताळच्या सुट्टी संपल्या वर सुरू होणार आहे असे खासगी शाळे कडून सांगण्यात आले आहे.

विभागाचे नाव :- नगरोड विभाग

  1. 1 ली ते 7 वी सुरू होणाऱ्या शाळा माहिती - एकूण मनपा शाळा संख्या - 19

  2. दि .16 डिसेंबर 21 चा उपस्थिती अहवाल : एकूण उपस्थित विद्यार्थी- 2276

1. विभागातील एकूण खाजगी शाळा :- 50 पैकी 25 शाळा सुरू

2.खाजगी शाळेतील विद्यार्थी संख्या :- 33934

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT