crime 12.jpg 
पुणे

मसाज सेंटरच्या नावाखाली घडत होता 'हा' धक्कादायक प्रकार

सकाळवृत्तसेवा

औंध (पुणे) : बाणेर येथील कपिल मल्हार सोसायटी समोरील 'द मिंट' या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार चतुशृंगी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. हा व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यवसाय चालवणा-या मालकिणीसह व्यवस्थापकाला चतुशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याप्रकरणी व्यवस्थापक अमर दत्तू कांबळे(३५ वर्षे) (रा. फ्लॅट १४, चंद्रगन सोसायटी, चिंतामणी शाळेजवळ आंबेगाव पठार) मालकीण व स्पा चालक ज्योती दाऊ बनसोडे (३१ वर्षे, रा. तेलगू चौक जांभूळवाडी रोड, कात्रज) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांना बाणेर येथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची शनिवारी (ता. ११ जुलै) रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी रात्री साडेनऊ वाजता पथकाकडून छापा टाकण्यात आला. यावेळी तेथील चार पिडीत महिलांची सुटक करण्यात आली व वेश्या व्यवसायासाठी वापरण्यात आलेले दोन मोबाईल फोन व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशयित आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील पिडीत महिलांना संरक्षणार्थ मुंढवा येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख व सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूल आणि एअर फोर्स बाल भारती स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणा

Dajipur Sanctuary Rain : फोंडा घाट, दाजीपूर अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस; चंदगड तालुक्यालाही पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT