mla.jpg 
पुणे

पटेल रुग्णालयास राज्य शासनाकडून 2 कोटी 26 लाखांचा निधी

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयास २० बेडचे आयसीयु वार्ड तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून 2 कोटी 26 लाख रुपयाचा निधीचा चेक कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील  कांबळे यांनी  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ अमित कुमार यांच्याकडे सुपूर्त केला.

त्यामुळे या रुग्णालयातील आयसीयू वार्ड लवकरच सुरू होऊ शकेल. यासंर्दभात दिनांक 22 मे 2020 रोजी आमदार सुनील  कांबळे यांनी मुख्यमंत्री व  पालकमंत्री यांना पत्र देऊन निधीची मागणी केली होती. व त्याचा वारंवार पाठपुरावा केलेला होता. त्यानुसार राज्य शासनाने ३ कोटी 26 लाख रुपयाचा निधी आय.सी.यु. सेंटर तयार करण्यासाठी मंजूर केला. त्यातील १कोटी रुपये यापूर्वीच रुग्णालयास देण्यात आले होते. उरलेला निधीचा चेक यावेळी  बोर्डाकडे देण्यात आला. 

यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सी.ई.ओ. अमित कुमार साहेब, सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विद्याधर गायकवाड, नगरसेविका  प्रियांका श्रीगिरी, किरण मंत्री व नगरसेवक दिलीप गिरमकर तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप काळोखे, शशी पुरम, संतोष यादव, तुषार मंत्री हे उपस्थित होते. 

आजपर्यंत राज्य शासनाने कोणताही निधी पुणे कँटोन्मेंट बोर्डाला दिलेला नव्हता परंतु आमदार कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदा अशा प्रकारचा निधी पुणे कँटोन्मेंट बोर्डाला मिळाला असे सीईओ अमित कुमार व नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त करताना यावेळी सांगितले व कांबळे यांचे आभार मानले. 
यावेळी आमदार कांबळे यांनी बोलताना सांगितले की कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाचा काळात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या हॉस्पिटलने कोविड-19 रुग्णांसाठी 450 बेड उपलब्ध करून देऊन तसेच 20 बेडचा आयसीयु वार्ड तयार करून रुग्णांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि आज पर्यंत एक हजार पेक्षा जास्त रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत म्हणून त्यांनी या रूग्णालयाचे कौतुक केले. व यापुढे रुग्णांच्या उपचारासाठी काही निधी कमी पडत असेल तर राज्य शासनाकडे प्रयत्न करून निधी मिळवून देईल असेही आश्वासन यावेळी आमदार कांबळे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

SCROLL FOR NEXT