corona positive sakal
पुणे

बारामतीत 48 तासात 20 जण कोरोनाबाधित

काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ लागल्याचे आकडेवारी दर्शवू लागली आहे. बारामतीत गेल्या 48 तासात तब्बल 20 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने आता प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा नगण्य होता. मात्र गेल्या दोन दिवसात पुन्हा पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. तपासण्यांची संख्याही वाढविण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरुन आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तपासण्याही वाढल्या आहेत.(baramati news latest)

दरम्यान देशात व राज्यात ज्या गतीने पॉझिटीव्हीटीचा दर वाढत आहे, त्याचा विचार करता आता बारामतीतही नागरिकांनी कमालीची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विनामास्क फिरणा-यांची संख्या बारामतीत वाढली असून पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या खाजगी व शासकीय शाळा आजपासून बंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत, त्या मुळे शाळांमधून संसर्गाचा धोका आता कमी होणार आहे.(baramati news today marathi)

कुटुंबात बाहेर गावाहून प्रवास करुन आल्यानंतर आजारी पडणा-यांनी घराबाहेर पडू नये, तातडीने डॉक्टरांकडे जाऊन औषधे घ्यावीत, दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना एकाच वेळेस कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण बारामतीत अधिक आहे. दरम्यान गरज पडल्यास पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरु करण्यासह ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडसचा आढावा घेण्यास प्रशासनाने प्रारंभ केला आहे. वैद्यकीय सुविधा वृध्दींगत करण्याकडे आता लक्ष दिले जात असून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरुन दैनंदिन आढावा घेतला जात आहे.(corona positive in baramati)

विनामास्क फिरणा-यांची संख्य लक्षणीय....

कोरोनाचा उद्रेक होत असताना आजही बारामतीत विनामास्क फिरणा-यांची संख्या लक्षणीय होती, अनेक संस्था, बँका यातून बिनधास्त लोक विनामास्क फिरत होते आणि त्यांना विचारणारे कोणीही नव्हते, अशी स्थिती होती. कडक कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही प्रशासन आज सुस्तावलेलेच दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT