Temperature Sakal
पुणे

२०११-२०२० दशक ठरले सर्वाधिक उष्ण

विकासासाठी होत असलेले आधुनिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.

अक्षता पवार

पुणे - विकासासाठी होत असलेले आधुनिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे (Polution) निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्यामुळे जागतिक तापमानात (Global Temperature) वाढ होत नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत पर्यावरणास (Environment) हानिकारक ठरणाऱ्या बाबी वाढल्याने २०११ ते २०२० हे दशक सर्वाधिक उष्ण ठरले आहे. या दशकातील वार्षिक तापमानात सरासरीपेक्षा ०.३४ अंश सेल्सिअसने वाढल्याची नोंद झाली आहे. (2011 to 2020 was the Hottest Decade)

२०२० मध्ये २१ मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे देशातील एक हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील ५० टक्क्यांहून जास्त मृत्यूंचे कारण हे अतिवृष्टी, वीज कोसळणे आणि पूर यांसारख्या नैसर्गिक घटना आहेत, तर गेल्या वर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू बिहारमध्ये झाल्याचे नोंदले गेले आहे. बिहारमध्ये ३७९ लोकांना नैसर्गिक आपत्तींमुळे जीव गमवावा लागला होता.

बदलाचा परिणाम...

  • नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ

  • त्यामुळे कृषीसह औद्योगिक क्षेत्रावर परिणाम

  • तापमानवाढीमुळे बर्फाच्या वितळण्याचे प्रमाण जास्त

  • समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ

  • आम्लवर्षासारखे प्रकार जास्त

अहवालातील महत्त्वाच्या बाबी...

  • नैसर्गिक आपत्तीमुळे २०२० मध्ये जागतिक स्तरावर नागरिकांचे आंतरिक विस्थापित होण्याचे प्रमाण सुमारे ४० दशलक्ष

  • देशात ३.९ दशलक्ष नागरिक अंतर्गत विस्थापित झाले असून, जागतिक स्तरावर भारत चौथ्या क्रमांकावर

  • २०११ ते २०२० दरम्यान ३३ चक्रीवादळांची निर्मिती

  • देशात २०२० दरम्यान आलेल्या चक्रीवादाळांमुळे ११५ लोकांनी जीव गमावला, तर सुमारे १७ हजार पाळीव जनावरांचा मृत्यू झाला

वातावरण बदलाची कारणे...

  • हरितगृह वायूंचे उत्सर्जन

  • औद्योगिक क्षेत्रातून उत्पन्न होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन

  • वायू प्रदूषणात होणारी वाढ

  • जागतिकीकरणामुळे वनांच्या क्षेत्रात होत असलेली घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT