23000 rs fraud at swarget bus stop pune
23000 rs fraud at swarget bus stop pune 
पुणे

पुणे : 60 रुपयांची अंडाभुर्जी पडली 23 हजाराला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वारगेट बस स्थानकाजवळील हातगाडीवर अंडाभुर्जी खाण्यासाठी गेलेल्या तरुणास महिलेसह तिघांनी रस्त्यात अडवून लुबाडले. रोख रक्कम व मोबाईल, असा 23 हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली.

तुकाराम किसन जाधव (वय 26, रा. लोहार, उस्मानाबाद), राघवेंद्र इराचंद्र इरेळी (वय 25, रा. जत, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अक्षय शिंदे (वय 23 , रा. रायकर मळा, धायरी) याने फिर्याद दिली. अक्षय त्याचा मित्र युवराज ढावरे याच्यासह दुचाकीवर फिरायला गेला होता.

भूक लागल्याने ते स्वारगेटजवळील हातगाडीवर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले. भुर्जी खाल्यानंतर युवराज तेथून निघून गेला. तर अक्षय रस्ता ओलांडून पीएमपी बस थांब्याजवळ लावलेल्या त्याच्या दुचाकीकडे जात होता. त्या वेळी संबंधित महिलेने त्यास अडविले. तेथे आलेल्या तुकाराम जाधव व राघवेंद्र इरेळी यांनी शिवीगाळ करून जबरदस्तीने खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा 23 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. या घटनेनंतर अक्षयने स्वारगेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT