Corona-Patient 
पुणे

पुणे शहरात आज २३४२ नवे रुग्ण; ३३ रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात सोमवारी (ता.२२) दिवसभरात २ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एका दिवसातील एकूण नवीन कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३२१ वर गेली आहे. जिल्ह्यात आज ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार १८७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५६७, नगरपालिका क्षेत्र १७१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५४ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, दिवसात ३ हजार ३०८ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत शहरातील १ हजार ७८९, पिंपरी चिंचवडमधील ८४६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६०४, नगरपालिका हद्दीतील ५५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १४ जण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४० हजार ९२ सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्ण आहेत. यापैकी ८ हजार ४११ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. उर्वरित ३१ हजार ६८१ जणांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २ हजार ९४२, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ८८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ६४२, नगरपालिका हद्दीतील ६८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील२६२ रुग्ण आहेत.

दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील सर्वाधिक १५ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११, जिल्हा परिषद हद्दीतील पाच आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT