Pune News Esakal
पुणे

Pune News: विमानतळावर २४ वर्षीय महिलेचा राडा; महिलेवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे विमानतळावर २४ वर्षीय महिलेने राडा घातला

सकाळ डिजिटल टीम

पुणे विमानतळावर २४ वर्षीय महिलेने राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे विमानतळावर कार्यरत असलेल्या महिला सीआयएसएफ निरीक्षक यांच्यावरही महिलेने हल्ला केला आहे. ही सर्व घटना पुणे विमानतळावर काल (१२ मार्च) रोजी रात्री १२ वाजता घडली आहे.

याप्रकरणी पुणे विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सीआयएसएफ इन्स्पेक्टर (निरीक्षक) रूपाली ठोके (वय 39) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. या संदर्भात गुंजन अगरवाल (वय २४) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजन अगरवाल यांनी टॅक्सीमधून प्रवास करून विमानतळावर पोहचल्यावर त्यांनी टॅक्सी चालकाला पैसे देण्यासाठी नकार दिला. टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे मदत मागितली असता टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लुल्ला यांना शिवीगाळ केली. तसेच विमानतळ प्रस्थान (departure) गेट क्रमांक १ वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला.

हा सर्व प्रकार जेव्हा विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रूपाली ठीके यांना निदर्शनास आला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी यांनी त्यांचे एक न ऐकताच अगरवाल यांनी फिर्यादी यांची शासकीय ड्रेसची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतक्यावर न थांबता आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा देखील घेतला.

या संपुर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT