Ring-Road
Ring-Road 
पुणे

रिंगरोडमुळे २५ टक्के प्रदूषणात घट

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडमुळे दररोज बाहेरून पुण्यात येणारी आणि पुण्यातून बाहेर जाणारी साठ ते सत्तर हजार वाहने कमी होतील. त्यामुळे शहरातील जवळपास २० ते २५ टक्क्यांनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर, सासवड, सोलापूर, नगर, नाशिक, माणगाव, कोकण व मुंबई या ठिकाणाहून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरातून जावे लागते. अशी दररोज सुमारे साठ ते सत्तर हजार वाहने आहेत. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांवर त्याचा ताण पडतो. परिणामी, शहरात हवेचे व ध्वनीचे प्रदूषण वाढले आहे. याशिवाय वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ही वाहने शहराच्या आत न आणता बाहेरच्या बाहेर योग्य त्या दिशेला वळवण्यासाठी या रिंगरोडचा उपयोग होणार आहे. परिणामी, शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. अंतर कमी होऊन, प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच इंधनाची बचत होईल. दोन्ही महापालिकेच्या क्षेत्रातील २० ते २५ टक्के वायू प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पुणे रिंग रोड या महामार्गावर १४ मल्टीलेव्हल इंटरचेंज,आठ मोठे ब्रीज,४७ लहान ब्रीज,१८ व्हायडक्ट (रेल्वे किंवा रस्त्यांसाठी दरीवर बांधलेला लांबलचक पूल), १७ टनेल आणि ४ रोड ओव्हर ब्रीज बांधले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांकडून कोणत्याही प्रकारचा टोल स्वीकारला जाणार नाही. पुणे रिंग रोडला ९ राष्ट्रीय महामार्ग, ४ राज्य महामार्ग, १ अर्बन आर्टेरियल रोड जोडले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सव्वीस हजार कोटींचा खर्च

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे पूर्व व पश्चिम असे दोन मार्ग तयार करण्यात येणार आहेत. हा महामार्ग १७३. ७ किलोमीटर एवढ्या लांबीचा असणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी जवळपास १५५४. ६४ हेक्टर जमीन आवश्यक आहे. तसेच अंदाजे २६ हजार ८३१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आठ पदरी रोड हा ३८ किलोमीटरचा असून, त्यात दोन पदरी सर्व्हिस रोड असणार आहे. सहा पदरी रोड हा विना सर्व्हिस रोडचा असून, तो ९९ किलोमीटर पर्यंत असणार आहे. तसेच चार पदरी रोड विना सर्व्हिस रोडचा असून, तो ३७ किलोमीटर लांबीचा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT