Satbara Sakal
पुणे

‘सात-बारा’वर आता होणार २५० पिकांची नोंद

सात-बारा उताऱ्यामध्ये यापूर्वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सोयाबीन आदींसह २० पिकांची नोंद होत होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सात-बारा (Satbara) उताऱ्यामध्ये यापूर्वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सोयाबीन आदींसह २० पिकांची नोंद (Crop Registration) होत होती. मात्र, आता नव्याने सुमारे २५० पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होऊ लागली आहे. महसूल खात्याने प्रायोगिक तत्त्वावर लागू केलेल्या ‘ई-पीक’ पाहणीतून ही गोष्ट समोर आली आहे. (250 Crops will now be Recorded on Satbara)

गेल्या अनेक वर्षांपासून सात-बारा उताऱ्यावर पिकांची नोंदी अद्ययावत होत नाहीत. यापार्श्‍वभूमीवर पिकांची अचूक नोंद होण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने ‘ई-पीक’ ॲप विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील २० तालुक्‍यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप म्हणाले, ‘‘जुन्या पद्धतीने आतापर्यंत सात-बारा उताऱ्यावर १५ ते २० पिकांची नोंद घातली जात होती. मात्र, या ॲपमुळे जवळपास २५० प्रकाराच्या पिकांची नोंद झाली आहे.’

शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ‘ई-पीक’ पाहणी या मोबाईल ॲपद्वारे पीकाचा फोटो अपलोड करू शकतात. मोबाईल ॲपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने त्या शेतकऱ्याच्या शेताचे स्थानही तलाठ्याला कळते.

‘ई-पीक’ ॲपवर पिकांची वर्गवारी केली असून, यामध्ये १८ वर्ग आहेत. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाउसमधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा यात समावेश आहे. अशा प्रकारे या ॲपमध्ये ५८० पिकांची नोंदी घेता येते.

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, तुमच्या शहरात काय आहे ताजा भाव? जाणून घ्या

Pune Rain : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

Explained : बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातील सामने खेळण्यास नकारच दिला तर काय? त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल?

धक्कादायक! धनसंपत्तीच्या हव्यासापोटी चक्क नरबळीचा प्रयत्न; 8 महिन्यांच्या बाळाची थरारक सुटका, सय्यद इम्राननं असं का केलं?

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

SCROLL FOR NEXT