पुणे

ह्रदय हेलावून टाकणारी घटना; खेळताना विहीरीत पडून 3 वर्षाच्या अधिराजने गमावला जीव

मिलिंद संगई

बारामती : तालुक्यातील तीन वर्षीय मुलाचा विहीरीत पडून काल दुर्देवी अंत झाला. अधिराज सागर आहेरकर (रा. ब-हाणपूर, ता. बारामती) असे या त्याचे नाव आहे. 

काल सकाळी साडेदहाच्या सुमारास अधिराज हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. घरातील लोक आपापल्या कामात होते. शेजारची एक छोटी मुलगी आलेली होती, तिच्याशी अधिराज खेळत असावा या कल्पनेतून घरातील लोक आपापली कामे करत होते. त्याच वेळेस घराशेजारी असलेल्या विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिराजही दिसत नसल्याने संशय आल्याने त्याच्या वडीलांनी विहीरीत उडी मारली तेव्हा अधिराजच विहीरीत पडल्याचे लक्षात आले. त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याच्या कुटुंबियांनी तातडीने बारामतीचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय गाठले. तेथील डॉ. महेश जगताप यांनी त्याच्या पोटातील पाणी काढून त्याच्यावर उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र हा चिमुकला वाचू शकला नाही.

या घटनेने आहेरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या विहीरीला कठडे नसल्याने अधिराज हा खेळता खेळता तोल जाऊन या विहीरीत पडला असावा असा अंदाज आहे. मात्र ही घटना या कुटुंबियांवर आघात करुन गेली. 
व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: रायपूरमध्ये पावसाचा तांडव... अर्ध्यातासात चक्र फिरली... मॅच रद्द झाल्यास काय होईल? प्ले ऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

'स्ट्रगलर साला'ची तिकडी झळकणार 'मामाच्या गोव्याला जाऊया' तून मोठ्या पडद्यावर !

एकाच बिल्डिंग मध्ये राहूनही रणबीर आलियाच्या घरी जात नाहीत नीतू कपूर; 'हे' आहे कारण,म्हणाल्या, 'मुलांचं लग्न झाल्यावर...

Palghar: रखरखत्या उन्हात विजेचा लपंडाव, १४ तास वीजपुरवठा खंडित; पालघरकर घामाघूम

Maharashtra Weather: लवकरच उन्हापासून दिलासा मिळणार! महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी होणार? अखेर तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT