Crime Branch sakal
पुणे

पुणे : सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीच्या तब्बल 30 घटना उघड

31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त, गुन्हे शाखेच्या युनीट सहाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील बंद घरांची पाहणी करून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या (Crime Branch Unit 6)पथकाने अटक केली. आरोपीकडून आत्तापर्यंत घरफोडीच्या 30 घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.(crime news)

अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय 44, रा. मांजरी बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाकडून सुरू होता. घरफोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथीदारांसह संबंधित घरफोडीच्या घटना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने त्यास सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे तब्बल 30 गुन्हे केल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा एकूण 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.(pune news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT