Cyber-Crime 
पुणे

डॉक्‍टर तरुणाला ३० लाख १० हजारांचा ऑनलाइन घातला गंडा

सकाळवृत्तसेवा

पुणे - वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (एमडी) प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करून दोघांनी हडपसर येथील एका डॉक्‍टर तरुणाला ३० लाख १० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सौरभ लांबतुरे (वय २६, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संतोषकुमार आणि श्‍यामा सर ऊर्फ बाबूभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तक्रारदार तरुणाने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका वेबसाइटवर अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी एकाने सौरभ यांना फोन करून एमडीला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानुसार डॉक्‍टर आणि संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे बोलणे सुरू झाले. 

विविध फी आणि प्रोसेसिंगच्या नावाखाली संतोषकुमार आणि त्याचा साथीदार श्‍यामा यांनी संबंधित डॉक्‍टरकडून ऑनलाइन टप्प्याटप्प्याने ३० लाख १० हजार रुपये बॅंक खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर फोन बंद केला. रक्कम जमा करूनही त्यांना ‘एमडी’च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही.

तसेच, आरोपींनी त्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील तपास करत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT